mahabaleshwar

esahas.com

ऐन दिवाळीच्या हंगामात महाबळेश्‍वरमध्ये घाणीचे साम्राज्य

येथील नाकींदा, क्षेत्र महाबळेश्‍वर रस्त्यावर अज्ञातांनी मोठ्या प्रमाणावर कचरा टाकल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य झाले आहे. त्यामुळे याठिकाणी येणार्‍या पर्यटकांना दुर्गंधीमुळे पर्यटनाचा आनंद घेण्यासही त्रास होत असल्याने स्वच्छ महाबळेश्‍वर म्हणवून घेणार्‍या महाबळेश्‍वर पालिका मुख्याधिकार्‍यांवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे.

esahas.com

महाबळेश्वर-पांचगणीच्या अनाधिकृत बांधकामाबाबत निश्चित पॉलीसी ठरवा

भारतातील प्रसिध्द थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणारे महाबळेश्वर आणि पांचगणी परिसर इको सेन्सेटीव्ह झोन मध्ये समाविष्ट आहे. याठिकाणी पर्यावरण रक्षणासाठी अनाधिकृत बांधकामांना आवर घालणे आणि पर्यावरण पूरक उपाययोजना करणे हे नक्कीच आवश्यक आहे.

esahas.com

आरटीओ पथकास चुकवून कारचालक सुसाट

आरटीओ पथकास चुकवण्यासाठी महाबळेश्वर मधील गल्ली-बोळातून सुसाट कार पळवणाऱ्या कार चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी संबंधित कारचालक अजमुद्दिन वलगे याला एक लाख नव्वद हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. तसेच वाहन चालवण्याचा परवाना सहा महिन्यासाठी रद्द करण्यात आला आहे.

esahas.com

महाबळेश्वर येथील घरफोडीचा गुन्हा उघड

महाबळेश्वर येथे दिनांक 10 जानेवारी रोजी घरफोडीचा गुन्हा घडला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने वेगवान तपास करून तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 5 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

esahas.com

महाबळेश्वर जवळील मुकदेव घाटात 40 मजुरांचा टेम्पो पलटी

महाबळेश्वर तालुक्यातील मुकदेव गावानजीक घाटातील तीव्र उतारावर मजुरांना घेवून जाणाऱ्या टेम्पोला अपघात झाला आहे. या घटनेत 40 मजूर टेम्पोतून प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

esahas.com

महाबळेश्वरचा पारा घसरला!, यंदाच्या हंगामातील निचांकी तापमान

जिल्ह्यातील किमान तापमानात उतार येत असून महाबळेश्वरचा पारा आणखी घसरला. सोमवारी तर १०.०४ अंशाची नोंद झाली. त्यातच थंडगार वारे वाहत असल्याने जिल्ह्यात हुडहुडी वाढली आहे. तर महाबळेश्वरातील सोमवारचे किमान तापमान यंदाच्या हंगामातील निचांकी ठरले आहे.

esahas.com

कास व महाबळेश्वर साठी पर्यावरण पूरक सर्वसमावेशक आराखडा हवा

कास पठारावर झालेल्या बांधकामामुळे परिसराचे विद्रूपीकरण वाढले आहे. त्यामुळे रोजगाराभिमुख पर्यटनाला उत्तेजन देणारा सर्वसमावेशक आराखडा तयार करून त्याची राज्य सरकार पुढे मांडणी व्हावी व गरज पडल्यास पर्यटन वृद्धीसाठी केंद्र शासनाचाही निधी यासाठी आणला जाईल, अशा स्वरूपाची चर्चा खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याशी केली.

esahas.com

जावली, महाबळेश्वर, पाटण, सातारा तालुक्यात पावसाची पुन्हा जोरदार बॅटिंग

कोयना धरण पाणलोट क्षेत्राात पावसाचा जोर वाढला आहे. सोमवारी सकाळपासूनही मुसळधार पाऊस सुरुच आहे. आज, सकाळी मिळालेल्या माहितीनुसार गत चोवीस तासात धरणात सव्वा दोन टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे धरणात 68.89 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. दडी मारलेला पाऊस पुन्हा सुरू झाल्याने कोयना धरणात पाण्याची आवक वाढली आहे.

esahas.com

महाबळेश्वर तहसीलदारांचा प्रताप; खाजगी गाडीला लावला अंबर दिवा

महाबळेश्वर तहसीलदार यांनी पदाचा गैरवापर करून खाजगी गाडीवर बेकायदेशीर अंबर दिवा लावल्याप्रकरणी सातारा वाहतूक शाखेने कारवाई केली आहे.

esahas.com

वाई-पाचगणी घाटात अज्ञात चोरट्यांची लूटमार

वाई-पाचगणी दरम्यान असणाऱ्या पसरणी घाटात कारमधून प्रवास करणाऱ्या जावली तालुक्यातील बहीण-भावंडांना दुचाकी आडवी मारून त्यांच्याकडून भर रस्त्यात गळ्यातील चैन, रोख रक्कम असा दोन लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबवला. याप्रकरणी पाचगणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

महाबळेश्‍वरच्या माजी नगराध्यक्षांच्या भ्रष्ट्राचाराचा अहवाल शासनाकडे सादर

महाबळेश्‍वरच्या माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व तत्कालीन मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांच्या महाबळेश्‍वर नगरपालिकेच्या स्वच्छता अभियानात भ्रष्ट्राचार केल्याप्रकरणी शिवसेना युवासेना उप जिल्हाप्रमुख सचिन वागदरे यांनी नगरविकास खात्याकडे केलेल्या तक्रारीवरुन माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व तत्कालीन मुख्यधिकारी अमिता दगडे पाटील यांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सातारा यांना देण्यात आले होते.

esahas.com

'मध्य रेल्वे'चे महाबळेश्वरातील ‘हॉलीडे होम’ अखेर सील, वन विभागाची कारवाई

वारंवार नोटिसा बजावूनही रेल्वे विभागाने भाडेपट्ट्याचे नूतनीकरण न केल्याने वन विभागाकडून मध्य रेल्वेच्या महाबळेश्वर येथील हॉलीडे होमला टाळे ठोकळे. मध्य रेल्वेच्या ताब्यात असलेली पाच एकर मिळकत वन विभागाने ताब्यात घेतली असून, ही मिळकत सील केल्याची माहिती वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली.

esahas.com

महाबळेश्वर, कोयना परिसरात पर्यटन वाढवणार

महाबळेश्वर, कोयना बॅक वॉटर येथील पर्यटन विकासासाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद केलेली आहे. आगामी काळात या भागातील पर्यटन आणखी वाढावे, या उद्दिष्टाने विकास साधला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

esahas.com

अहिरमुरा येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

महाबळेश्वर तालुक्यातील आहीर मुरा येथे गुराख्यांच्या समोरच बिबट्याने शेळी ठार केल्याने गुराखी व नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

esahas.com

ठाणे येथील महिलेचा महाबळेश्वरमध्ये मृत्यू

महाबळेश्वरमध्ये पर्यटनास आलेल्या पर्यटक महिलेचा गुरुवारी अकस्मात मृत्यू  झाला. येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर आज सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत्यूचे कारण अस्पष्ट असल्याने व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. याबाबतची फिर्याद हॉटेल व्यावसायिक शिवराज सणस यांनी दिली. सुचित्रा अविनाश गोगर (वय ४५, रा. ठाकुर्ली, ठाणे) असे मृत महिलेचे नाव आहे.

esahas.com

महाबळेश्वरचे सर्व टूरिस्ट स्पॉट बंद

ओमायक्रॅानच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासनाने नवी नियमावली जाहीर केली असून जिल्ह्यातील पर्यटन स्थळे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाबळेश्वरमधील सर्व टुरिस्ट पाॅईंट बंद करण्यात आले असून अम्युजमेंट पार्क, वेण्णा लेक बोटिंग पाॅईंट सुद्धा बंद करण्यात आले आहेत. लाॅजिंग मात्र 100 टक्के क्षमतेने सुरू राहणार असून रेस्टाॅरंट 50  टक्के क्षमतेने सुरू असल्याची माहिती महाबळेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली आहे.

esahas.com

वेण्णा लेक येथील प्रताप सिंह उद्यानाचा होणार कायापालट

वन विभागाचे वेण्णालेक जवळ असलेल्या प्रतापसिंह उद्यानाचा कायापालट करण्यासाठी त्याच्या नुतनीकरणाचे काम वन विभागाच्या वतीने सुरू करण्यात आले असुन या नुतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ पत्रकार संघाचे अध्यक्ष अभिजीत खुरासणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात आला. यावेळी वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी हे देखिल उपस्थित होते.

esahas.com

महाबळेश्वरच्या बाजारपेठेत गव्याचा रात्रीच्या वेळी फेरफटका

थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर नगरीत निसर्गाचा मनमुरादपणे आनंद घेऊन झोपलेल्या पर्यटकांची झोप मोड झाली आहे. चक्क बाजारपेठेत रात्रीच्या वेळी गवा शिरल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांचीही तारांबळ उडाली आहे.

esahas.com

महाबळेश्वरमध्ये पर्यटक युवतीचा विनयभंग

महाबळेश्वर तालुक्यातील मेटगुताड परिसरातील एका खाजगी बंगल्यात पुणे येथून आलेल्या पर्यटक कुटुंबियां समवेत लहान मुलाचे संगोपनाचे काम करणाऱ्या एका मदतनीस युवतीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. बंगल्यातील केअर टेकरने विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली असून त्याच्याविरुद्ध महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

महाबळेश्‍वरमधील हॉटेल व्यावसायिकास मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा

जावली तालुक्यातील गडी येथील मित्राकडे आलेल्या धारदेव, ता. महाबळेश्‍वर येथील एका हॉटेल व्यावसायिकास माऊंटन व्हिला रो हाऊस येथे रात्रीच्या वेळेस अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शाम मालुसरे नावाच्या व्यक्तीसह अन्य तीन अनोळखींवर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

महाबळेश्वर येथे ‘बेरीज् एक्सलन्स सेंटर’ उभारणीसाठी सर्वतोपरी मदत करणार : खा. शरदचंद्रजी पवार

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व लगतचे तालुक्यांमध्ये स्ट्रॅाबेरी पिकाचे प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते. महाबळेश्वर आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटनाचे ठिकाण असून शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पिक आहे. देशामध्ये ४००० एकर क्षेत्रावर स्ट्रॅाबेरी पिकाचे उत्पादन घेतले जाते. यापैकी ३००० एकर क्षेत्र हे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व लगतच्या तालुक्यातील आहे.

esahas.com

महाबळेश्वर - पोलादपूर रस्त्याला अजून किती दिवस गोंजारणार?

महाबळेश्वर-पोलादपूर रस्ता हा जिल्ह्यातील एक महत्त्वाचा मार्ग म्हणून ओळखला जातो. असे असतानाही या रस्त्याची डागडुजी व देखभाल-दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याकडून अक्षम्य बेजबाबदारपणा केल्याचे दिसून येत आहे. परिणामी संबंधित अभियंत्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी येथील पर्यटक, स्थानिक व्यावसायिक आणि प्रवाशांमधून होत आहे.

esahas.com

महाबळेश्वरमध्ये गुलाबी थंडीची चाहूल

गेल्या अनेक दिवसांपासून ऑक्टोबरच्या उन्हामुळे घाम येत असतानाच आता गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. बहुतांश जिल्ह्यातील विशेषतः पुण्याचे किमान तापमान सोळा अंशाच्या आसपास नोंदविण्यात आले असून दिवाळीच्या आसपास तापमान आणखी कमी होणार आहे. महाबळेश्वर हे सर्वाधिक थंड पर्यटन स्थळ बनले असून तेथे तापमान १४.८ अंश सेल्शियस इतके आहे.

esahas.com

पॉवर टिलरच्या अपघातात एकाचा मृत्यू

महाबळेश्वर तालुक्यातील कोट्रोशी येथील शेतकरी पॉवर टिलरमध्ये अडकून जागीच ठार झाला. शंकर शेलार असे ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात झाली आहे.

esahas.com

‘हिलदारी’मार्फत पालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांना ‘सेफ्टी किट’चे वितरण

1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधत हिलदारी मार्फत महाबळेश्‍वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांना मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या हस्ते ‘सेफ्टी किट’च्या वितरण कार्यक्रमाची  सुरुवात करण्यात आली. 

esahas.com

विमलताई पारठेंनी विलगीकरण कक्षासाठी हॉटेल केले पालिकेच्या स्वाधिन

येथील ज्येष्ठ नगरसेविका विमलताई पारठे यांनी आपले संपूर्ण हॉटेल कोरोना बाधित रुग्णांच्या विलगीकरण कक्षासाठी पालिकेच्या स्वाधिन केले आहे तर याच विलगीकरण कक्षात दाखल झालेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या नाश्ता, चहा व दोन वेळच्या जेवणाची सोय नगरसेवक रवींद्र कुंभारदरे हे मोफत करणार आहे. या दोन नगरसेवकांच्या दातृत्वाचे शहरातून कौतुक होत आहे. 

esahas.com

पाचगणी येथील कोविड सेंटरला आ. मकरंद पाटील यांची भेट

पाचगणी डॉन अ‍ॅकॅडमी व बेल एअर हॉस्पिटल येथील कोविड केअर सेंटरला आ. मकरंद पाटील यांनी भेट देऊन कोरोना रुग्णांची विचारपूस केली. तसेच त्यांच्या अडचणी समजून घेऊन संबंधित यंत्रणेला तशा सूचना दिल्या. आमदारांच्या भेटीने रुग्णांच्या चेहर्‍यावर समाधान दिसून आले.

esahas.com

महाबळेश्‍वरमध्ये पर्यटकांना आसरा देणार्‍या हॉटेलवर कारवाई

जिल्हाबंदी आदेश झुगारून महाबळेश्‍वरच्या सहलीवर येणे मुंबई येथील पर्यटकांना चांगलेच महागात पडले आहे. पालिकेच्या विशेष पथकाने पर्यटकांना व पर्यटकांना आसरा देणार्‍या हॉटेलवर दंडात्मक कारवाई करून 55 हजारांचा दंड शुक्रवारी वसूल केला. पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांच्या या धाडसी कारवाईचे शहरातून चांगलेच कौतुक केले जात आहे.

esahas.com

दानवली येथे नागरिकांना निकृष्ट दर्जाचे शिधावाटप

दानवली (ता. महाबळेश्‍वर) येथे शासकीय शिधा वाटपात निकृष्ट दर्जाचे धान्य मिळत असल्याने आज नागरिक संतप्त झाले होते. असले निकृष्ट दर्जाचे धान्य देण्याऐवजी ते देऊ नका, अशा भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

esahas.com

विलगीकरण कक्षासाठी महाबळेश्‍वर पालिकेने घेतली दोन हॉटेल ताब्यात

शहरातील लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना घरी स्वतंत्र विलगीकरणाची सोय नाही, अशा नागरिकांसाठी पालिकेच्या वतीने विलगीकरण कक्षाची सोय करण्यात आली आहे. यासाठी पालिकेने दोन हॉटेल ताब्यात घेतली असून, ही सोय नाममात्र शुल्कात देण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

esahas.com

पाचगणी कोविडमुक्त करण्यास पालिका सरसावली

कोरोनाच्या नव्या व्हायरसचा प्रादुर्भाव तसेच लोकांच्या बेफीकीरपणामुळे कोरोनाचा नवा स्ट्रेन जोरात फैलावतोय. बाधित रुग्णांचे प्रमाण दररोज वाढत असल्याने त्याला वेळीच रोखण्याकरिता पाचगणी नगरपरिषद शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये नगरपालिकेने तयार केलेल्या दहा आरोग्य पथकांमार्फत घरोघरी जाऊन नागरिकांची ऑक्सिजन लेव्हलची तपासणी केली जाणार असून, काही लक्षणे दिसून आल्यास अशा लक्षणे असलेल्यांची नावे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास देऊन त्यांची तपासणी करून पाचगणी शहरात वाढणार्‍या कोरोनाला प्रतिबंध घातला जाणार आहे.

esahas.com

भिलारमध्ये ‘जनता कर्फ्यू’स नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुस्तकांचे गाव म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या भिलार गावात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी भिलार ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने शुक्रवार, दि. 16 एप्रिल ते मंगळवार, दि. 27 एप्रिलपर्यंत दहा दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’ जाहीर केला असून, या पाठोपाठ तालुक्याच्या पूर्व भागातील गोडवली, खिंगर, आंब्रळ व राजपुरी या चार गावांतील ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने दि. 19 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत ‘जनता कर्फ्यू’ जाहीर केला आहे.

esahas.com

पाचगणी पालिकेतर्फे आंबेडकर कॉलनीमध्ये सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी

पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी कोरोना विषाणूमुक्त वातावरण सोडीयम हायपोक्लोराईट द्रावणाने निर्जंतुकीकरण करण्यात आले. सोडीयम हायपोक्लोराईट द्रावणाची फवारणी करत विषाणूमुक्तीचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला.

esahas.com

पाचगणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी

जगभरात कोरोनाने उच्छाद मांडला आहे. या भयंकर विषाणूचा प्रादुर्भाव पाचगणी शहर व परिसरात झाला असून, नुकतेच जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नगरसेवक विठ्ठल (तात्या) बगाडे यांचे आकस्मित निधन झाल्याने दरवर्षी धूमधडाक्यात सार्वजनिकरीत्या साजर्‍या होणार्‍या या वार्षिक आनंदोत्सवावर विरजण पडले आहे. त्यामुळे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती बुधवारी (दि. 14) शहरात साधेपणाने साजरी करण्यात आली.

esahas.com

पाचगणी बाजारपेठेत विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाई

पाचगणी बाजारपेठेवर नगरपालिका, पाचगणी पोलीस ठाणे आणि महसूल विभागाच्या संयुक्तिक पथकाची करडी नजर असून या पथकाने दोन दिवसांत पर्यटक, व्यापारी, ग्राहक व नागरिकांकडून मास्क न वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे या नियमांचे पालन न केल्याने दोन दिवसात तब्बल 9200 रुपयांचा दंड वसूल केला.

esahas.com

वेण्णा नदीलगत लिंगमळा येथे अनधिकृत बांधकामाचा धडाका

महाबळेश्‍वरमधील वेण्णालेक नदीपात्रातील परिसरात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी दोन धनिकांविरुद्ध नगरपालिकेने गुन्हा दाखल केला गेला असून देखील याच परिसरातील लिंगमळा येथील सर्व्हे नंबर 35 मध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. हे बांधकाम नदी पात्राला लागून करण्यात आले असून, नगरपालिकेकडून  कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे स्थानिक नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. एकाला एक न्याय आणि दुसर्‍याला वेगळा न्याय, असा अन्याय का? असा सवाल देखील कारवाई झालेल्या बांधकाम धारक

esahas.com

पाचगणी-महाबळेश्‍वर मुख्य मार्गावर कारचा झाडावर आदळून अपघात

पाचगणी-महाबळेश्‍वर मुख्य मार्गावर प्युअर बेरी फॅक्टरी समोर कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात महाबळेश्‍वरचे 3 युवक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सातारा येथे उपचार सुरू आहेत.

esahas.com

लोकसहभागातून पाचगणीच्या कचरा व्यवस्थापनाचा डंका राजस्थानमध्ये

‘स्वच्छ सुंदर पाचगणी’च्या यशाला लोकसहभागाची जोड मिळाल्यानेच पाचगणी देशाला दिशादर्शक ठरले, असल्याचे प्रतिपादन पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कर्‍हाडकर यांनी राजस्थान येथील अल्वा येथे केले.

esahas.com

गोडवलीत उघड्यावर कचरा टाकल्यास एक हजार रुपये दंड

गोडवली (ता. महाबळेश्‍वर) येथे लोकसहभागातून स्वच्छता अभियान राबवण्यात आले. तर त्यानंतर झालेल्या बैठकीत ग्रामपंचायत क्षेत्रात उघड्यावर कचरा टाकणार्‍यावर 1000 रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. कचरा टाकणार्‍याचा फोटो काढून पाठविणार्‍याला 500 रुपये बक्षीस देण्याचेही ठरवण्यात आले.

esahas.com

पाचगणीत जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला गळती; हजारो लिटर पाणी वाया

पर्यटननगरी पाचगणी (ता. महाबळेश्‍वर) येथील जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीतून अनेक ठिकाणी गळती सुरू असून हजारो लिटर पाणी रस्त्यालगतच्या गटारातून वाहून जात आहे. नागरिकांच्या दृष्टीने पाणी महत्त्वाचे असलेतरी जीवन प्राधिकरणाच्या बेजबाबदार मस्तवाल अधिकार्‍याला पाण्याचे महत्त्व नाही. अधिकार्‍याच्या हलगर्जीपणामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. पाण्याच्या समस्येमुळे पाचगणीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे.

esahas.com

पाचगणी पालिकेने गांधीजींच्या स्मृतींचे टाकाऊ लोखंडी वस्तूपासून साकारले टिकाऊ शिल्प

स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधींच्या पाचगणी येथील वास्तव्याच्या स्मृती हा पाचगणीकरच नव्हे, तर महाराष्ट्रवासीयांसाठी एक अभिमानाचा क्षण नी आठवणींचा ठेवा. या सुखद स्मृतींचा सुगंध जतन करण्याच्या हेतूने पाचगणी पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी टाकाऊ बांधकाम साहित्य वापरून गांधीजींच्या 8 फूट उंच प्रतिमेची निर्मिती करण्याच्या संकल्प केला. त्यामुळे इमारत बांधकामातील भंगार, टाकाऊ सामान, राडारोडा यांचा पुनर्वापर करून गांधीजींचे आणि स्वच्छतेचे असलेले सर्वश्रूत नाते अधोरेखित केले आहे. 

esahas.com

गुरेघरच्या शॉपिंग सेंटरमधील दुकान गाळे फोडणार्‍या तिघांना अटक

गुरेघर (ता. महाबळेश्‍वर) येथील ग्रामपंचायत शॉपिंग सेंटरमधील दुकान गाळ्यामध्ये राहुल प्रकाश सणस (वय 43, रा. 245 गंगापुरी, ता. वाई) यांचे दुकान असून, हे दुकान व शेजारील पाच दुकाने दि. 20 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री 9 वाजल्यापासून दि. 21 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 6च्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी व त्यांचे शेजारील असे एकूण पाच दुकानांचे शटर कशाच्यातरी सहाय्याने उचकटून आत प्रवेश करून दुकानाच्या गल्ल्यातील एकूण 4200 रुपये रोख रक्कम घरफोडी करून चोरून नेल्याची घटना घडली होती.

esahas.com

प्रत्येक ज्येष्ठांनी कोरोना लस घेण्यासाठी आग्रही राहावे

‘महाबळेश्‍वर तालुका हा अतिदुर्गम असल्याने सर्व तालुक्यातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला कोरोना लस मिळायला हवी, याची खबरदारी आरोग्य विभागाने घ्यावी व प्रत्येक ज्येष्ठांनी ही लस घेण्यासाठी आग्रही राहावे,’ असे आवाहन ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांनी केले.

esahas.com

सुदृढ, सक्षम व सुशिक्षित पिढी घडवणे काळाची गरज

‘अलीकडच्या सोशल मीडियाच्या जमान्यात युवा पिढी आळशी बनत चालली असून, व्यायामाच्या सवयीने सुदृढ व सक्षम आणि गुणवत्तापूर्ण पिढी निर्माण होणे ही काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन पाचगणी येथील ‘अश्‍वटेक अ‍ॅकॅडमी’चे संस्थापक सुरेश मालुसरे यांनी केले.

esahas.com

आंब्रळच्या सरहद्दीवर रस्त्याचे बेकायदेशीरपणे उत्खनन

महाबळेश्‍वर तालुक्यातील आंब्रळ ग्रामपंचायत परिसरात राजपुरी व आंब्रळच्या सरहद्दीवर असणार्‍या एका धनिकाने आपल्या बंगल्याच्या सुरक्षा भिंतीजवळचा रस्ता जेसीबीने खोदून रहदारीसाठी बंद केला. तब्बल वीस फुटांपेक्षा अधिक रस्ता खोदण्यात आल्यामुळे ग्रामस्थांनी आश्‍चर्य व्यक्त केले. 

esahas.com

बील वसुलीसाठी गेलेल्या दोन वायमनला वीजग्राहकांची मारहाण

पाचगणी महावितरण कार्यालयाचे दोन कर्मचारी बील वसुलीसाठी गेले असता खिंगर (ता. महाबळेश्‍वर) येथे मारहाण झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, महावितरणच्या कर्मचार्‍यांनी आज याविरोधात काम बंद आंदोलन करून पोलीस ठाण्यात मारहाण करणार्‍यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. 

esahas.com

भिलार येथे दुचाकींचा अपघात; एकजण ठार तर दोघे जखमी

भिलार (ता. महाबळेश्‍वर) येथे मंगळवारी रात्री दोन दुचाकींच्या भीषण अपघातात श्‍वेता शशिकांत ओंबळे (वय 23) ही युवती ठार जाली असून, अनिकेत आनंदा चिकणे (वय 20) गंभीर जखमी तर अन्य एक जखमी झाला आहे.

esahas.com

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पाचगणीच्या घाटजाई-काळेश्‍वरी देवीची यात्रा रद्द

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यात्रा उत्सव समारंभ यावर शासनाने निर्बंध घातले आहेत. याच अनुषंगाने यावर्षी होणारी घाटजाई-काळेश्‍वरी देवीची वार्षिक यात्रा रद्द करण्यात आली असून, फक्त धार्मिक विधीचे कार्यक्रम होणार आहेत, असे यात्रा कमिटीने सांगितले.  

esahas.com

पाचगणी पोलिसांकडून दुचाकी चोरट्यास अटक

मोटारसायकल चोरी करणार्‍या आरोपीला पाचगणी पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून मोटारसायकल हस्तगत केली आहे. अमर चंद्रकांत गवळी (वय 30, रा. जुना पॉवर हाऊस, ता. महाबळेश्‍वर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

esahas.com

शॉपिंग सेंटरमधील पाच दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली

गुरेघर (ता. महाबळेश्‍वर) येथील मॅप्रो गार्डन समोर असणार्‍या शॉपिंग सेंटरमधील पाच दुकानांचे शटर अज्ञात चोरट्यांनी उचकटून दुकानातील 4 हजार 200 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. त्यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे.

esahas.com

महाबळेश्‍वर येथील हवेच्या तपासणीचे दोन्ही अहवाल उत्तम

‘राज्याच्या पर्यावरण विभागाने सुरू केलेल्या ‘माझी वसुंधरा’ या उपक्रमांंतर्गत महाबळेश्‍वर येथील हवेची दोन वेळा गुणवत्ता तपासण्यात आली. या दोन्ही वेळी हवा तपासणीचे अहवाल उत्तम आहेत,’ अशी माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली. 

esahas.com

शेतकर्‍यांच्या नव्या पिढीने मधुमक्षी पालन व्यवसायाकडे वळावे

‘आज शेतकर्‍यांची नवी पिढी शेतीपूरक व्यवसाय करीत आहे. मधुमक्षीपालन हे उत्पन्नाचे प्रभावी साधन असून, याकडे शेतकर्‍यांच्या नव्या पिढीने आर्थिक उन्नतीचा मार्ग म्हणून पाहावे,’ असे प्रतिपादन उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांनी केले.

esahas.com

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या महाबळेश्‍वर तालुकाध्यक्षपदी नितीन सदाशिव मालुसरे यांची निवड

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या महाबळेश्‍वर तालुकाध्यक्षपदी नितीन सदाशिव मालुसरे यांची निवड करण्यात आली. सदरील निवड संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष एस. आर. भोगावकर यांनी केली. 

esahas.com

‘स्वच्छ सर्वेक्षण जनजागृती’ स्पर्धेत ‘कोविड योद्धा’ लघुपटाला प्रथम पारितोषिक

पाचगणी पालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत जनजागृती स्पर्धेमध्ये युवासेनेचे महाबळेश्‍वर तालुकाध्यक्ष नितीन भिलारे दिग्दर्शित ‘कोविड योद्धा’ या लघुपटाला प्रथम पारितोषिक मिळाले.  कोरोना महामारीच्या काळात लोकांची सेवा करणार्‍या योद्ध्यांचे मनोबल वाढावे यासाठी

esahas.com

शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर पाचगणीत पोलिसांचे संचलन

आगामी शिवजयंती, यात्रा, उत्सव शांततेत पार पडावेत. कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकार्‍यांतर्फे देण्यात आलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन व्हावे. यासाठी पाचगणी पोलीस ठाणे हद्दीत आज पाचगणी पोलिसांनी जातीय दंगा काबू योजना रंगीत तालीम राबवली.

esahas.com

भिलार ‘वॉटरफॉल’ नजीकच्या डोंगरात वणवा

महाबळेश्‍वर-पाचगणी राज्यमार्गावरील भिलार वॉटर फॉल नजीकच्या डोंगररांगेमध्ये शुक्रवारी सकाळी वणवा लागला. वार्‍याचा वेग अधिक असल्याने ही आग वेगाने पसरत गेली. 

esahas.com

महाबळेश्‍वर-पाचगणी मार्गावर कारची समोरासमोर धडक

महाबळेश्‍वर-पाचगणी मुख्य रस्त्यावर सोमवारी सकाळी वेण्णालेक नजीक दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन महिला किरकोळ तर एकजण गंभीर जखमी झाला. जखमींवर वाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नीलेश भगवान राजाणे (रा. रुपवली (गोलेकोंड) ता. महाड) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नानासो लक्ष्मण इंगळे (वय 40, रा. देऊळगावसिद्धीकी, जि. अहमदनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

esahas.com

नाताळसह सलग सुट्ट्यांमुळे पाचगणी-महाबळेश्‍वर पर्यटनस्थळे पर्यटकांनी बहरली

ख्रिसमस व नववर्षाच्या स्वागतासाठी जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले पाचगणी-महाबळेश्‍वर सज्ज झाले असून, नाताळ सणानिमित्त सलग जोडून सुट्या आल्याने दोन्ही गिरिस्थाने पर्यटकांनी बहरली आहेत. विविध पॉइंट पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका क्षेत्रात नाईट कर्फ्यू असल्यामुळे अनेकांनी या गिरिस्थानावर सुट्टीचा आनंद एन्जॉय करण्यावर भर दिला आहे.

esahas.com

जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर किल्ले प्रतापगड परिसरात जिल्हा प्रशासने 144 कलम लागू केल्याने तसेच ग्रामपंचायतींच्या  निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने यावर्षी किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन अत्यंत साधेपणाने कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करीत शासनाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

esahas.com

लोक न्यायालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढावीत

‘लोक न्यायालय ही लोकाभिमुख चळवळ आहे. त्यामुळे आर्थिक आणि वेळेची मोठी बचत होत असून, दोघा पक्षकारांमधील समेटामुळे त्यांच्यात ऋणानुबंध निर्माण होतो. त्याचबरोबर भांडणात वेळ गेल्याने कुटुंबाची खुंटलेली प्रगती लोक न्यायालयातील समेटामुळे पक्षकाराला साधता येते. त्यामुळे लोक न्यायालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढावीत,’ असे अवाहन तालुका विधी सेवा संघाचे अध्यक्ष दिवाणी व फौजदारी न्यायाधीश शैलेश कंठे यांनी केले.

esahas.com

पाचगणीत व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी

कोरोनाचे संकट कोसळल्याने शासनाने 20 मार्चपासून पूर्णतः लॉकडाऊन करून पर्यटकांना बंदी घालण्यात आली. गेली सहा महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने पर्यटन व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पाचगणी शहरातील बहुतांशी लोकांचे जीवनमान हे पर्यटनावर अवलंबून असल्याने पॉइंटवरील व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी टेबललँड व्यापारी असोसिएशनच्यावतीने पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

esahas.com

‘सौ चुहे खाकर..बिल्ली हज को चली’ अशी अवस्था ‘त्या’ बारा नगरसेवकांची

नगराध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणे म्हणजेच ‘सौ चुहे खाकर..बिल्ली हज को चली,’ अशी अवस्था ‘त्या’ बारा नगरसेवकांची झाली असून, त्यांनी स्वतः प्रथम आत्मपरीक्षण करावे नंतर नगराध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करावे, असा प्रतिटोला नगरसेवक कुमार शिंदे ऑनलाइन सभेस विरोध केलेल्या ‘त्या’ बारा नगरसेवकांना लगावला आहे.

esahas.com

पाचगणीत विना मास्क फिरणार्‍यांवर पालिकेची कारवाई

महाबळेश्‍वर तालुक्यात कोरोना महामारीने थैमान घातले असून, अजूनही लोकांना कोरोनाची भीती व गांभीर्य नसल्या कारणामुळे काहीजण मास्क व सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. अशा लोकांवर पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर व पाचगणीचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार व सहकार्यांनी अचानकपणे पाचगणी बाजारपेठ, बसस्थानक, शॉपिंग सेंटर परिसरात मोहीम राबवून जनतेमध्ये मास्क न वापरणे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, गाडीत एकापेक्षा जास्त व्यक्ती असताना मास्क न वापरणे, दुकानात ग्राहकांनी एकमेकांमध्ये 6 फुटांपेक्

esahas.com

महाबळेश्‍वरमध्ये ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेचा प्रारंभ

कोरोनाच्या नियंत्रणासाठी तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेची अंमलबजावणी पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाबळेश्‍वर बाजारपेठेतील व्यापारी कुटुंबाची वैद्यकीय तपासणी करून करण्यात आली. या वेळी नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकार्‍यांनी केले.

esahas.com

लॉकडाऊन काळातील पाच महिन्यांचे भाडे माफ करावे

पाचगणी नगरपालिका हद्दीतील सर्व स्टॉल धारकांचे लॉकडाऊन काळातील पाच महिन्यांचे भाडे माफ करावे, अशी मागणी पाचगणी श्रमजीवी स्टॉल युनियनच्यावतीने पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर व नगराध्यक्षा लक्ष्मी कर्‍हाडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

esahas.com

महाबळेश्‍वरच्या ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड उपलब्ध करावेत

महाबळेश्‍वर ग्रामीण रुग्णालयात येत्या 15 दिवसांत व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड उपलब्ध व्हावेत, अन्यथा प्रशासनास आंदोलनास सामोरे जावे लागेल, अशा आशयाचे निवेदन महाबळेश्‍वर येथील ‘मनसे विद्यार्थी सेने’च्यावतीने तहसीलदार सुषमा पाटील व पालिका प्रशासनास देण्यात आले आहे.

esahas.com

मलकापूरच्या ‘जननी चॅरिटेबल ट्रस्ट’तर्फे खिंगर व भिलार येथे पीपीई किटचे वितरण 

जननी चॅरिटेबल ट्रस्ट मलकापूर यांच्यातर्फे पीपीई किट, सॅनिटायझर, मास्क, ऑक्सिमीटर साहित्याचे वितरण ग्रामपंचायत खिंगर व भिलार येथे करण्यात आले.

esahas.com

पाचगणी पोलिसांची मास्क न घालता फिरणार्‍यांवर कारवाई

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलिसांनी अंमलबजावणी सुरू केली असून, आज पाचगणी पोलिसांनी मास्क न घालता फिरणार्‍या नागरिक व वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

esahas.com

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पाचगणी पालिका हद्दीतील विविध पॉइंटस् बंद

राज्य सरकारने ई-पास रद्द केल्यामुळे नागरिकांच्या गर्दीमुळे पाचगणी शहर व परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी पालिका हद्दीतील विविध पॉइंटस् सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंद करण्यात आले आहेत.

esahas.com

गोडवलीत आणखी 15 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह; प्रशासनाकडून बाधित परिसर सील

महाबळेश्‍वर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, पाचगणी शहरानजीक असलेल्या गोडवली गावात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. मंगळवारी रात्री गोडवलीतील 15 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने गावात कोरोनाचा विस्फोट झाला आहे.  पाचगणी शहरातही आणखी 3 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून, तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या 494 झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थ व शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

esahas.com

महाबळेश्‍वरमध्ये दोन दिवसांत 36 जणांना कोरोनाची बाधा

येथील पंचायत समितीमधील एका अधिकार्‍याला कोरोनाची बाधा झाल्याचे आज स्पष्ट झाल्याने तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे खबरादारीचा उपाय म्हणून पंचायत समिती इमारतीमध्ये औषध फवारणी करून ती दोन दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. दरम्यान, मंगळवारी 26 तर बुधवारी 10 अशा एकूण 36 जणांना कोरोनाची बाधा झाल्याने तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 494 वर पोहोचली आहे. 

esahas.com

धार्मिकस्थळे उघडण्याच्या मागणीसाठी भिलारमध्ये ‘भाजप’तर्फे घंटानाद आंदोलन

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील बंद असणारी सर्व मंदिरे व धार्मिक स्थळे गेली कित्येक दिवसांपासून उघडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तरी देखील राज्य सरकारकडून दखल घेतली गेली नसल्याने आज शनिवारी (दि. 29) राज्य शासनाच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्यावतीने महाराष्ट्रभर घंटानाद आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्याच धर्तीवर महाबळेश्‍वर तालुक्यात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली. 

esahas.com

पाचगणीत ‘गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया’च्या गजरात घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन

पाचगणी शहरातील घरगुती गणपती विसर्जनासाठी पालिका प्रशासनाने स्वतःची अनोखी अशी यंत्रणा आज राबवल्याने पालिकेच्या कर्मचार्‍यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करीत पाचगणीसह ग्रामीण भागात कसल्याही वाद्यांचा निनाद न करता शांततेने आणि उत्साहात घरगुती गणेशाचे विसर्जन पार पडले. ‘गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया’च्या गजरात आज गणेशाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. 

esahas.com

महाबळेश्‍वरमध्ये आणखी 13 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

महाबळेश्‍वर शहरात आज 13 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून, यामध्ये पालिकेचे नाक्यावरील कर्मचारी, स्वच्छता विभागाच्या काही कर्मचार्‍यांचा समावेश आहे. आजअखेर शहरातील बाधितांची संख्या 184 झाली असून, 58 जण कोरोनामुक्त आहेत तर महाबळेश्‍वर तालुक्यात आजअखेर 375 कोरोनाबाधित असल्याची माहिती मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली.  

esahas.com

संततधार पावसामुळे महाबळेश्‍वर तालुक्यातील खरीप पिकांचे नुकसान

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे महाबळेश्‍वर तालुक्यातील खरीप पिकांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. सततच्या पावसाने शेतात पाणी साचल्यामुळे येथील पिके कुजू लागली आहेत. यामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील खरीप हंगाम धोक्यात आल्यामुळे कोरोनाच्या महामारीत विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या शेतकर्‍यांच्या आर्थिक अडचणीत आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे. 

esahas.com

नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा

‘शहर व परिसरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु यावर्षी या उत्साहावर कोरोनाचे सावट आहे. त्यासाठी शासनाने घालून दिलेल्या अटींना अधीन राहूनच गणेशोत्सव साजरा करावा व कायद्याचे उल्लंघन केल्यास नियमानुसार कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील,’ असे प्रतिपादन पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी केले.

esahas.com

महाबळेश्‍वर शहरातील 32 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

शहरात आज 32 कोरोना रुग्णांची भर पडली असून, यामध्ये पालिकेतील 7 कर्मचार्‍यांचा समावेश असल्याने पालिका प्रशासन चांगलेच हादरले आहे. 32 रुग्णांमुळे शहराची कोरोना रुग्णांची शतकाकडे तर तालुक्याची द्विशतकाकडे वाटचाल सुरू झाली आहे. पालिका कर्मचार्‍यांच्यामुळे पालिकेचे कामकाज काही दिवसांसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली. 

esahas.com

कोरोना काळात महाबळेश्‍वरातील भूमिपुत्रांना वनविभागाकडून अतिक्रमणाबाबत नोटिसा

महाबळेश्‍वर तालुक्यातील भूमिपुत्रांना कोरोना साथीच्या काळात राष्ट्रीय हरित लवाद, सर्वोच्च न्यायालय व जीपीएसने केलेल्या मोजणीचा संदर्भ देत तालुक्यातील भूमिपुत्रांना बांधकामे काढून घेण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कोरोना साथीच्या प्रादुर्भावाने हैराण नागरिकांना वनक्षेत्रपाल, महाबळेश्‍वर यांनी नोटिसा बजावून नेमकी वेळ साधल्याने भूमिपुत्रांमध्ये अस्वस्थता आहे.

esahas.com

बाधित रुग्णाचा परिसर शिथिल करून मायक्रो कंटेन्मेंट झोन लागू

गोडवली, ता. महाबळेश्‍वर येथील कोरोना परिस्थिती पाहता शासनाने लागू केलेला कंटेन्मेंट झोन तब्बल महिन्याभराने आज शिथिल करून बाधित रुग्णाच्या घराजवळचा परिसर मायक्रो कंटेन्मेंट झोन लागू करून गावकर्‍यांना दिलासा दिला आहे.

esahas.com

वैद्यकीय तपासणीसाठी महाबळेश्‍वर व पाचगणी पालिकांनी आशा सेविकांची नेमणूक करावी

शहरातील नागरिकांच्या वैद्यकीय तपासणीचा वेग वाढवण्यासाठी महाबळेश्‍वर व पाचगणी पालिकांनी वॉर्डनिहाय आशा सेविकांची नेमणूक करावी,’ अशी सूचना आ. मकरंद पाटील यांनी महाबळेश्‍वर तालुका आढावा बैठकीत केली.