आगामी शिवजयंती, यात्रा, उत्सव शांततेत पार पडावेत. कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकार्यांतर्फे देण्यात आलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन व्हावे. यासाठी पाचगणी पोलीस ठाणे हद्दीत आज पाचगणी पोलिसांनी जातीय दंगा काबू योजना रंगीत तालीम राबवली.
पाचगणी : आगामी शिवजयंती, यात्रा, उत्सव शांततेत पार पडावेत. कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकार्यांतर्फे देण्यात आलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन व्हावे. यासाठी पाचगणी पोलीस ठाणे हद्दीत आज पाचगणी पोलिसांनी जातीय दंगा काबू योजना रंगीत तालीम राबवली.
शिवजयंती अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांनी संचलन करून शांततेचे आवाहन केले. शहरातील मुख्य बाजारपेठेतून रुट मार्च (पथ संचलन) घेण्यात आले.
पाचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या नेतृत्वाखाली आज नवीन पोलीस ठाण्यापासून संचलनाला सुरुवात करण्यात आले.नगरपालिका रोड, टेबल लँड कॉर्नर, गावठाण, बाजारपेठ आदी भागातून संचालन करण्यात आले.
कोरोना पार्श्वभूमीवर आलेला शिवजयंती उत्सव आणि यात्रा शांततेत व शासनाच्या नियमानुसार पार पाडावी. या दरम्यान कोणत्याही प्रकारच्या अनुसूचित घटना घडू नये याविषयी ग्रामस्थांशी संवाद साधला.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अनुषंगाने पांचगणी पोलीस दलाच्यावतीने विशेष दक्षता घेतली जात असून त्याचाच एक भाग म्हणून पाचगणीत हे जातीय दंगा काबू प्रात्यक्षिक राबविण्यात आले.
या योजनेमध्ये पाचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.