20 वर्ल्ड कप संपताच आता पुढील क्रिकेट सीरिजचे वेध लागले आहेत. राहुल द्रविड टीम इंडियाचा पूर्णवेळ प्रशिक्षक झाल्यापासून ही भारतीय क्रिकेट टीमची पहिली सीरिज न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.
मुंबई : टी20 वर्ल्ड कप संपताच आता पुढील क्रिकेट सीरिजचे वेध लागले आहेत. राहुल द्रविड टीम इंडियाचा पूर्णवेळ प्रशिक्षक झाल्यापासून ही भारतीय क्रिकेट टीमची पहिली सीरिज न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. 17 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या टी20 सीरिजमधील पहिली मॅच जयपूरमध्ये होणार असून या मॅचपूर्वी दोन्ही टीमसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. दिल्लीतील हवेच्या प्रदुषणाचा परिणाम जवळपासच्या शहरांवर होत आहे. जयपूरची हवा देखील यामुळे दूषित झाली आहे. तेथील हवेतील प्रदूषण वाढले आहे.
जयपूर एयर क्वालिटी इंडेक्सनुसार गेल्या आठवड्यापासून जयपूरमधील हवेत प्रदूषण वाढले आहे. रविवारी जयपूरच्या हवेतील स्तरची 337 इतकी नोंद करण्यात आली आहे.
8 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय मॅच भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील मॅचच्या निमित्ताने जयपूरमध्ये 8 वर्षांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच होणार आहे. टीम इंडिया जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर पहिल्यांदाच टी20 मॅच खेळणार आहे. यापूर्वी इथे 12 वन-डे आणि 1 टेस्ट मॅच झाली आहे. टीम इंडियाने 12 पैकी 8 वन-डेमध्ये विजय मिळवला आहे.
तर इथे झालेली एकमेव टेस्ट मॅच ड्रॉ झाली होती. भारत आणि न्यूझीलंड मालिकेतील पहिली टी20 मॅच जयपूरमध्ये 17 नोव्हेंबरला होणार आहे. दुसरी टी20 19 तारखेला रांचीमध्ये तर तिसरी 21 तारखेला कोलकातामध्ये होईल. 25 ते 29 नोव्हेंबर दरम्यान पहिली टेस्ट कानपूरमध्ये तर 3 ते 7 डिसेंबर दरम्यान दुसरी टेस्ट मुंबईत खेळली जाणार आहे.
टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा, केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, ईशान किशन, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर.अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज
टेस्ट सीरिजसाठी टीम इंडिया : अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, ऋद्धीमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.
टीप: विराट कोहलीला कानपूर टेस्टसाठी विश्रांती देण्यात आली असून तो मुंबई टेस्टमध्ये टीम इंडियात सहभागी होईल.