sports

भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय!

पाकिस्तानला आधी पळपळ पळवलं, अगदी रडवलं आणि शेवटी हरवलंच

India's resounding victory over Pakistan!
भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना म्हटले की, दर्शकांचे पैसावसूल मनोरंजन निश्चित असते. मग त्यांचा सामना क्रिकेटच्या मैदानावर रंगो अथवा हॉकीच्या. शुक्रवारी (१७ डिसेंबर) हॉकीच्या आशियाई चँपियन्स ट्रॉफीमध्ये हे कट्टर प्रतिद्वंद्वी संघ आमने सामने आले होते. उभय संघांमध्ये झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ३-१ ने थरारक विजय मिळवला.

ढाका : भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना म्हटले की, दर्शकांचे पैसावसूल मनोरंजन निश्चित असते. मग त्यांचा सामना क्रिकेटच्या मैदानावर रंगो अथवा हॉकीच्या. शुक्रवारी (१७ डिसेंबर) हॉकीच्या आशियाई चँपियन्स ट्रॉफीमध्ये हे कट्टर प्रतिद्वंद्वी संघ आमने सामने आले होते. उभय संघांमध्ये झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ३-१ ने थरारक विजय मिळवला.
भारतीय संघाचा स्टार हॉकीपटू हरमनप्रीत सिंह याने चौथ्या क्वार्टरमध्ये संघासाठी तिसरा गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केला. आशिया चँपियन्स ट्रॉफीतील या महामुकाबल्यात विजय मिळवत भारतीय हॉकी संघाने उपांत्य फेरीच्या दिशेने कूच केली आहे.
भारतीय संघाच्या विजयाचा नायक ठरलेल्या उपकर्णधार हरमनप्रीतने या सामन्यात वैयक्तिक २ गोल केले. यातील पहिला गोल त्याने आठव्या मिनिटाला आणि दुसरा गोल ५३ व्या मिनिटाला केला होता. विशेष म्हणजे, त्याने हे दोन्हीही गोल पॅनल्टी कॉर्नरवर केले होते. हरमनप्रीतव्यतिरिक्त आकाशदीप सिंगने ४२ व्या मिनिटाला गोल केला होता. कौतुकास्पद बाब म्हणजे, भारतीय संघाने सामना संपायला केवळ ७ मिनिट शिल्लक असताना तिसरा व महत्त्वपूर्ण गोल केला होता.