न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ जाहीर
विराटपाठोपाठ रोहितही बाहेर, अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची धुरा!
विश्वचषकानंतर विराट कोहलीने आराम घेतल्यामुळे कसोटी संघाचे नेतृत्व रहाणेकडे सोपवण्यात आले आहे. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी आणि ऋषभ पंत यांनाही कसोटीमध्ये आराम देण्यात आला आहे. के. एस भरत आणि वृद्धमान साहा यांच्याकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मुंबई : अजिंक्य रहाणेला न्यूझीलंडविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. तर उपकर्णधार म्हणून चेतेश्वर पुजाराची निवड करण्यात आली आहे.
विश्वचषकानंतर विराट कोहलीने आराम घेतल्यामुळे कसोटी संघाचे नेतृत्व रहाणेकडे सोपवण्यात आले आहे. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी आणि ऋषभ पंत यांनाही कसोटीमध्ये आराम देण्यात आला आहे. के. एस भरत आणि वृद्धमान साहा यांच्याकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. न्य़ूझीलंडविरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली भारतीय संघात परतणार आहे. त्यानंतर करणधारपदाची सुत्रे विराट कोहलीकडे सोपवण्यात येणार आहेत.
मुंबईकर श्रेयस अय्यरची कसोटी संघात निवड करण्यात आली आहे. विराट कोहलीच्या चौथ्या क्रमांकावर विराट कोहली फलंदाजीसाठी उतरु शकतो. सलामीवीर म्हणून शुबमन गिल, राहुल आणि मयांक यापैकी दोन जणांची वर्णी लागणार आहे. तिसऱ्या क्रमांकावर पुजाराचा क्रमांक लागतो. चौथ्या क्रमांकासाठी श्रेयस अय्यरचे स्थान पक्कं मानले जात आहे. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यानंतर श्रेयस अय्यर कसोटीत पदार्पण करणार का? हे पाहणे आत्सुक्याचे ठरणार आहे. पाचव्या क्रमांकावर अजिंक्य रहाणे खेळणार आहे. अष्टपैलू म्हणून जाडेजा, अश्निन, अक्षर पटेल आणि जयंद यादव यांचा समावेश करण्यात आलाय. प्रसिद्ध कृष्णा, ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज, उमेश यादव यांच्यावर वेगवान माऱ्याची जबाबदारी असणार आहे.
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने शुक्रवारी न्यूझीलंडविरोधातील पहिल्या कसोटी मालिकेच्या संघाची घोषणा केली. चॅम्पियन ट्रॉफीपासून भारतीय संघ सतत क्रिकेट खेळत आहे. त्याचा परिणाम विश्वचषकातही दिसून आला. त्यामुळे काही सिनिअर खेळाडूंना आराम दिला. यामध्ये रोहित शर्मा, ऋषभ पंत, मोहम्मद शामी, जसप्रीत बुमराह, हनुमा विहारी यांचा समावेश आहे.