deshvidesh

तामिळनाडू मधील कृष्णगिरी जिल्ह्यतील तल्ली येथे शिवजयंती उत्सव


Shiva Jayanti celebrations at Talli in Krishnagiri district of Tamil Nadu
तामिळनाडू मधील कृष्णगिरी जिल्ह्यतील तल्ली येथे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम रविवार, दि. 22 फेब्रुवारी रोजी प्रतिमेची मिरवणूक करून साजरी करण्यात येणार आहे.

सातारा : तामिळनाडू मधील कृष्णगिरी जिल्ह्यतील तल्ली येथे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम रविवार, दि. 22 फेब्रुवारी रोजी प्रतिमेची मिरवणूक करून साजरी करण्यात येणार आहे. तसेच भव्य रॅली , शोभायात्रा, काढण्यात येणार आहे  व शिवजयंती निमित्त सकाळी फ्री मेडिकल कॅम्प , मराठा स्टीट, मराठा पालम गाव,तल्ली,  छोटे इंग्लंड, हुसूर जवळ, कृष्णगिरी जिल्हा, तामिळनाडू, येथे मोठ्या प्रमाणात साजरी  करणार आहोत. तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान श्री अनिल राव देवकर यांनी केले आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे, बेंगलोर मराठा मठाचे मठाधीश सद्गुरु श्री मंजुनाथ स्वामी, तसेच कर्नाटक राज्याचे माजी अर्थ मंत्री, ग्रह मंत्री, इंडस्ट्रियल मंत्री, थोर नेते  माननीय श्री पी जी आर सिंधिया साहेब उपस्थित राहणार आहेत आणि श्री श्याम सुंदरराव गायकवाड, अध्यक्ष मराठा समाज कर्नाटक राज्य, व डॉक्टर वेणू गोपाल जी, अनेक,बेंगलोर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमा ची शोभा वाढवण्या साठी सर्व मराठी समाजातील व हिंदू धर्मातील लोकांकडून, सर्व हिंदू संस्था , सदस्य, सभासद,लोकांकडून, तरुण कार्यकर्त्यां कडून नियोजन करण्यात येत आहे. तसेच हुसूर, बेंगलोर, जवळील सर्व छोट्या-मोठ्या शहरात महाराष्ट्रातून नोकरी, व्यवसाय, कामासाठी आलेल्या महाराष्ट्रीयन लोकांनी कार्यक्रमास उपस्थित राहुल कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी निमंत्रण व आव्हान श्री अरुण जाधव (भाऊ) ग्रॅनाईट उद्योजक यांनी केली आहे. कार्यक्रमास, तल्ली, अनेकल, रायकोटा, केल मंगला, डिग्नी कोटा, कनकपुरा, रामनगर, जवळील सर्व गावातील असलेले मराठा समाजातील लोक व सर्व हिंदू समाजातील बांधव तसेच आजी माझी आमदार, खासदार, सरपंच, नगरसेवक, नगराध्यक्ष संपूर्ण कृष्णगिरी जिल्हा,  तामिळनाडू व जवळील कर्नाटक राज्यातील मराठा समाजातील गावा गावात असलेली मराठी लोक शिवजयंती साजरी करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.