techgadget

कारमध्ये फोन चार्ज केल्यानंतर इंधनाची टाकी रिकामी होत का? मासिक पेट्रोल बजेटवर काय परिणाम होतो? सत्य जाणून बसेल धक्का


Does charging your phone in the car empty the fuel tank? What is the impact on your monthly petrol budget? You will be shocked to know the truth
कारमध्ये अनेक जण फोन चार्ज करतात किंवा ब्लूटूथ वापरतात. या दोन्ही गोष्टींचा वापर केल्यामुळे गाडीतील इंधन जास्त वापरला जातो. काय आहे यामागील तथ्य आज आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत.

मासिक पेट्रोल बजेटवर काय परिणाम होतो?

तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, कारमध्ये स्मार्टफोन चार्जिंग आणि ब्लूटूथ या दोन्हींचा वापरल्यास कारच्या  अल्टरनेटरवर 20 वॅटपेक्षा कमी अतिरिक्त भार पडत असतो. तर याचा इंधन कार्यक्षमतेवर 0.05 टक्क्यांपेक्षा कमी परिणाम पाहिला मिळतो. 

तर जाणून घ्या कारच्या यूएसबी पोर्टवरून एक सामान्य स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी अंदाजे 5 ते 15 वॅट वीज लागते. ही वीज कारच्या अल्टरनेटरमधून येते, ज्याला इंजिनद्वारे ऊर्जा पुरवली जात असते. एवढी कमी वीज निर्माण करण्यासाठी इंजिनला फार कष्ट करावे लागत नाही.

आता हे जाणून घ्या, एक्स्प्रेस वेवर गाडी चालवताना एक सामान्य कारचे इंजिन हजारो वॅटची गरज पडते. यामध्ये 10-15 वॅटचा अतिरिक्त भार इंजिनसाठी फार नसतो. अशात फोन चार्जिंगमुळे कारची इंधन कार्यक्षमता केवळ 0.03 टक्क्यांनी कमी होते. याचा सरळ अर्थ असा की, कारमध्ये एक लिटर पेट्रोल असल्यास त्याच्या बरोबरची ऊर्जा खर्च करण्यासाठी तुम्हाला हजारो किलोमीटर गाडी चालवावी लागणार आहे.


आता जर तुम्ही ऑफिसला ये-जा करताना कारमध्ये फोन दररोज चार्ज केला तरी खूप कमी इंधन लागणार.  स्मार्टफोनला 0 ते 100 टक्के चार्ज करण्यासाठी लागणारी अतिरिक्त ऊर्जा आणि इंधनसाठी तुम्हाला फक्त दोनपेक्षा कमी खर्च होतो. त्यामुळे याचा परिणाम तुमच्या मासिक पेट्रोल बजेटवर काही परिणाम होत नाही. 


तुमच्या कारमध्ये ब्लूटूथद्वारे गाणे ऐकण्यासाठी किंवा कॉल घेण्यासाठी खूप कमी वीज लागते. एक सामान्य ब्लूटूथ मॉड्यूल चालू करण्यासाठी फक्त 2.5 मिलिवॅट वीज लागते.हा वापर इतका कमी आहे की त्यामुळे अल्टरनेटरवर कोणताही मोजता येण्याजोगा ताण पडत नाही. म्हणून, ब्लूटूथ वापरल्याने तुमच्या कारच्या मायलेजवर परिणाम होणार नाही.

कारमधील कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरण्यासाठी सर्वाधिक विजेचा वापर होतो. उदाहरणात नेव्हिगेशन, मीडिया आणि ब्लूटूथ नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या डिजिटल स्क्रीन 20 ते 50 वॅटपर्यंत वीज वापरू शकतात. पण त्यांचा परिणाम एअर कंडिशनरच्या तुलनेत खूपच कमी राहतो. इंधन वापरावरील त्यांचा प्रभाव खूप कमी असतो.

कारचा अल्टरनेटर इंजिनच्या यांत्रिक ऊर्जेचे विजेमध्ये रूपांतर होतं. त्याची कार्यक्षमता सुमारे 60 टक्के असते. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी हेडलाइट्स चालू करण्यामुळे इंजिनवर येणारा अतिरिक्त भार हा फोन चार्जला कमी लागतो. 

पेट्रोल किंवा डिझेल वाचवणे हे तुमचे ध्येय असेल, तर फोन चार्जर वापरणे सोडून दिल्याने फारसा फायदा होणार नाही. तुम्हाला जर पेट्रोल किंवा डिझेल वाचवायचं असेल तर इलेक्ट्ऱॉनिक उपकराचा वापर कमी करा. त्यासोबत एसीचा संतुलित वापर करा. त्यासोबत स्थिर गतीने गाडी चालवा. तसंच अनावश्यक वेग टाळा.