वाई, ता. वाई येथे दुचाकी जाळून चारचाकी वाहनांची तोडफोड करणाऱ्या चार जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात वाई पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले. विजय मच्छिंद्र धोत्रे, वय २१, समीर पठाण, वय १९ दोघेही रा. सिद्धनाथवाडी, ता. वाई अशी दोघांची नावे असून दोन अल्पवयीन मुलांचा त्यामध्ये समावेश आहे.
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
धोम कॉलनी येथे बंगल्याचे रंगकाम करत असताना शिडीवरून पाय घसरून पडल्याने प्रकाश नारायण दुर्गावळे (रा कुसगाव) यांचा मृत्यू झाला.
राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात परखंदी (ता वाई) हायस्कूलचा विद्यार्थी यश ज्ञानेश्वर शिंदे व मार्गदर्शक विज्ञान शिक्षक तथा मुख्याध्यापक प्रसाद यादव यांनी तयार केलेल्या मल्टीपर्पज केटरिंग मशीन या उपकरणाला राष्ट्रीय सुवर्णपदक मिळाले आहे. या प्रदर्शनात महाराष्ट्राचा प्रथमच गौरव झाला आहे
मागील आठवड्यात भरतगाव (ता सातारा) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दोन महिला शिक्षिकांमध्ये मारामारी झाली होती. दोन्ही महिला शिक्षकांनी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारीही दाखल केल्या आहेत. या दोन्ही शिक्षिकांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी निलंबन केले आहे.
वाई शहरातील लोकमान्य टिळक ग्रंथालयाच्या समोर लावलेली दुचाकी दि. 2 सप्टेंबरला दुपारी 4 वाजता दुचाकी चोरटय़ाने चोरुन नेली. हा दुचाकी चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आला. परंतु तब्बल 12 दिवस तो चोरटा पोलिसांना सापडला नाही. अखेर दुचाकी मालकाने अज्ञात चोरटय़ाविरुद्ध वाई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील वाई पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने महाबळेश्वरातून चोरीला गेलेल्या पाच हिरो होंडा स्प्लेंडर व एक बुलेट अशा सहा दुचाक्या जप्त केल्या असून दोघांना अटक केली आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या या कारवाईचे जिल्हा पोलीस प्रमुख अजय बन्सल यांनी कौतुक केले आहे.
वाई तालुक्यातील लोहारे पिंपळाचा मळा येथे विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
प्रवासात संतुलन बिघाडल्यानं परदेशी महिलेनं बसमधून पुढं जाण्यास नकार देत गोंधळ घातला. ती पलायन करीत असताना महामार्गावरील धावत्या वाहनाला धडकल्यानं जखमी झालेल्या महिलेवर भुईंज पोलिसांनी उपचार करुन तिला न्यायालयाच्या आदेशानं येरवडातील मनोरुग्ण रुग्णालयात दाखल केलं. नाबूनजीओ लाँय बीरुनगी (वय 40) रिपब्लिक ऑफ युगांडा असं तिचं नाव आहे.