धोम कॉलनी येथे बंगल्याचे रंगकाम करत असताना शिडीवरून पाय घसरून पडल्याने प्रकाश नारायण दुर्गावळे (रा कुसगाव) यांचा मृत्यू झाला.
वाई : धोम कॉलनी येथे बंगल्याचे रंगकाम करत असताना शिडीवरून पाय घसरून पडल्याने प्रकाश नारायण दुर्गावळे (रा कुसगाव) यांचा मृत्यू झाला.
धोम कॉलनी येथे सतीश जाधव यांच्या बंगल्याचे शरद मारुती वाघ अमृत अंकुश गुरव व प्रकाश नारायण दुर्गावळे (रा कुसगाव) हे तिघे बंगल्याच्या बाहेरील रंगकाम होते .दुपारी अडीच च्या दरम्यान प्रकाश दुर्गावळे हा एक पाय शिडीवर आणि एक पाय खिडकीच्या लॅफ्ट वर ठेऊन रंगकाम करत असताना अचानक पाय घसरल्याने तो फरशीवर पडला.त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने खाजगी व नंतर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.पुढील तपास वाई पोलीस करत आहेत.