maharashtra

मान्सूनची सुट्टी संपली; कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 'ऑरेंज अलर्ट', विदर्भ मात्र कोरडा


Monsoon vacation ends; 'Orange alert' in western Maharashtra including Konkan, but Vidarbha remains dry
मोठ्या सुट्टीवर गेलेला मान्सून आता पुन्हा एकदा राज्यात सक्रिय होत असल्याची चिन्हं पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला मुंबईसह कोकणातही पावसाचा जोर वाढला असून या भागांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळणार असून, विदर्भात मात्र पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी आहे.

Maharashtra Weather News : मोठ्या सुट्टीवर गेलेला मान्सून आता पुन्हा एकदा राज्यात सक्रिय होत असल्याची चिन्हं पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला मुंबईसह कोकणातही पावसाचा जोर वाढला असून या भागांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळणार असून, विदर्भात मात्र पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी आहे. 

हवामान विभागानं पश्चिम विदर्भातील काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावली. तुलनेत पूर्व विदर्भातील काही भागातच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे, तर उर्वरित विदर्भात हवामान कोरडे असल्याचं पाहायला मिळालं. पुढील 24 तासांमध्येसुद्धा या परिस्थितीत फारसे बदल होणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा प्राथमिक अंदाज असून, राज्यात 15 जूनपासून सुरु झालेला मुसळधार पाऊस 20 जूनपर्यंत मुक्कामी राहण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. 

राज्यातील सर्वाधिक तापमानाचा आकडा 39 अंशांवर...

सोमवारी विदर्भाच्या ब्रह्मपुरी इथं तापमानाचा आकडा 39.6 अंशांवर पोहोचल्याचं पाहायला मिळालं आणि राज्यातील हे सर्वाधिक तापमान ठरलं. तुलनेनं उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात मात्र तापमानाच काही अंशांची घट पाहायला मिळाली. मुंबई शहर आणि उपनगरांमध्येसुद्धा काही अंशी तापमानात चढ उतार झाल्याचं पाहायला मिळालं. 

राज्यात सध्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर इथं पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, गोंदिया, गडचिरोली या विदर्भाच्या भागांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी 

रत्नागिरी- पुढील 24 तासांसाठी जगबुडी, शास्त्री  आणि  कोदवळी या नद्यांनी इशारा पातळी ओलांडल्यानं सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. नदी पात्रातील नागरीकांना सर्तक  राहाण्याच्या सुचना  प्रशासनामार्फत देण्यात आल्या असून NDRF, SDRF यांना आपत्कालीन परिस्थितीसाठी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत

16 राज्यांमध्ये मुसळधार 

महाराष्ट्रासहित कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार आणि इतर 16 राज्यांमध्ये हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.