Maan

esahas.com

माण तालुक्यातील संभाजी सावंत यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान

दुष्काळी माण ची ओळख बदलुन माण म्हणजे बुध्दीवंताची व प्रतिभावंताची खाण अशी नवी ओळख करुन देण्यात या मातीतील अनेक प्रतिभावंत प्रशासकीय अधिकारी व गुणवंत खेळांडुचे मोठे योगदान आहे. त्याच प्रतिभावंत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या यादीत आता देवापुर नगरीच्या संभाजी सावंत या रांगड्या पण स्वभावाने अतिशय प्रेमळ ‌अधिकाऱ्याचा समावेश झाला असुन

esahas.com

माण मध्ये तलाठ्याच्या भावावर वाळूचोरीची कारवाई..

माण - खटावचे उपविभागीय अधिकारी शैलेश सुर्यवंशी व माणचे तहसीलदार सुर्यकांत येवले यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार हेमंत दिक्षीत यांनी वाळू माफियांना चांगलाच दणका दिला आहे.

esahas.com

म्हसवड यात्रा अखेर रद्द; लांबूनच मिळणार रथाचे दर्शन

म्हसवड येथील सिद्धनाथ व माता जोगेश्‍वरीची रविवारी 5 रोजी होणारी रथयात्रा प्रशासनाने अखेर रद्द केली. बॅरिकेंटिंग केलेल्या रथाचे लांबूनच भाविकांना दर्शन घेता येणार असून केवळ लसीकरण झालेल्या भाविकांनाच प्रवेश मिळणार आहे. गुरुवारी प्रांताधिकार्‍यांच्या उपस्थितीत झालेल्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

esahas.com

दहिवडी येथे स्विफ्ट- ट्रकचा भीषण अपघात

सातारा जिल्ह्यातील दहिवडी- फलटण या मार्गावर स्विफ्ट आणि ट्रकच्या समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत 2 युवक जागीच ठार झाल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. या अपघातात एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. दहिवडी येथून दीड ते दोन किलोमीटर अतंरावर असलेल्या पेट्रोल पंपासमोर हा भीषण अपघात झाला. ट्रकचा चालक हा घटनास्थळावरून पळून गेला आहे.

esahas.com

माण-खटाव मधील वाळू माफियांचे धैर्य वाढवितेय कोण? अधिकार्‍यांचेही ढासळतेय शील

माण-खटाव तालुक्यात वाळूचोरी जोमात सुरु असून याबाबत अनेकवेळा माध्यमांनी प्रशासनाला जागे करुन कारवाई करण्यास भाग पाडले आहे. या वाळू माफियांना धैर्य देण्यात जो अग्रभागी होता, त्याच्यावरच काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाल्याने अधिकार्‍यांवर कौतुकाचा वर्षाव झाला. मात्र यातील काही अधिकार्‍यांचे मात्र शील ढासळत असल्याचे चित्र आहे.

esahas.com

‘दादा’ज चायनीज चा भव्य शुभारंभ

म्हसवड येथील पुळकोटी रस्त्यावर भोरे व्यापार संकुल येथे खवैय्यांसाठी दादाज् चायनीज या हॉटेलचा शुभारंभ इंजि.सुनील पोरे यांच्या हस्ते पूजन करून व श्रीफळ वाढवून तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.

esahas.com

सातारा जिल्ह्यातील संभूखेडच्या जवानाचा राजस्थानात मृत्यू

संभूखेडचा (ता. माण) सुपुत्र जवान सचिन विश्वनाथ काटे (वय 24) यांचा राजस्थानमध्ये देशसेवा करताना मृत्यू झाला आहे. आज (शनिवार) संभूखेड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

esahas.com

'शुगरग्रीड' मुळे माणदेशच्या विकासाला चालना

शुगरग्रीड' या साखर कारखान्यामुळे माणदेशच्या विकासाला चालना मिळेल, असे प्रतिपादन समर्थ सद्गुरू चंद्रतनय महाराज यांनी केले.

esahas.com

खटाव-माण ऍग्रो मुळे शेती व्यवसायात क्रांती

पडळ, ता. खटाव येथील माळरानावर माजी आमदार व जिल्हा बँकेचे संचालक प्रभाकर घार्गे यांनी तीन वर्षांपूर्वी उभा केलेला. खटाव-माण ऍग्रो प्रोसेसिंग लिमिटेड या साखर कारखान्यामुळे शेती, पाणी व सिंचनाचा प्रश्न प्राधान्याने लक्ष मार्गी लावला. खटावसह माण तालुक्यातील शेती व्यवसायात क्रांती निर्माण झाली आहे. परिसरातील युवकांना रोजगार उपलब्ध झालाच आहे. शिवाय कारखाना परिसरामध्ये रस्त्यांचे जाळे निर्माण झाल्यामुळे वाहतूक व दळणवळण प्रश्न मार्गी लागला आहे.

esahas.com

सातारा एमआयडीसीसाठी पंधरा कोटी तर कोरेगावला एकसष्ट लाखाचा निधी

‘महाराष्ट्र औद्योगिक विकास कॉर्पोरेशन अंतर्गत सातारा औद्योगिक क्षेत्रात अग्निशमन केंद्राच्या बांधकाम तसेच त्यातंर्गत विविध कामांसाठी 14 कोटी 91 लाख 13 हजार 300 रुपये तर कोरेगाव (मिनी) औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यासाठी 60 लाख 97 हजार रुपयांची मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसीकडून प्रशासकीय मान्यता मिळाली  आहे,’ अशी माहिती ‘एमआयडीसी’चे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली.