maharashtra

माण मध्ये तलाठ्याच्या भावावर वाळूचोरीची कारवाई..


Action of sand theft against Talathi's brother in Maan ..
माण - खटावचे उपविभागीय अधिकारी शैलेश सुर्यवंशी व माणचे तहसीलदार सुर्यकांत येवले यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार हेमंत दिक्षीत यांनी वाळू माफियांना चांगलाच दणका दिला आहे.

म्हसवड : माण - खटावचे उपविभागीय अधिकारी शैलेश सुर्यवंशी व माणचे तहसीलदार सुर्यकांत येवले यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार हेमंत दिक्षीत यांनी वाळू माफियांना चांगलाच दणका दिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील बेकायदेशीर व रविवारी रात्री अनेक ठिकाणी बेकायदेशीर वाळू उपसा व गौण खनिज उत्खननाच्या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत अकरा वाजता म्हसवड - शिंगणापूर रोडवर माळवाडी येथे ट्रकच्या साहाय्याने वाळूची वाहतूक होत होती. त्याठिकाणी ट्रक क्रमांक (एम.एच.४२ - ८५८६) हा अवैध वाळू वाहतूक करत असल्याचे आढळून आले. सदरचा ट्रक तानाजी अंकुश भोसले रा.दिवड ता.माण यांच्या मालकीचा असून तो जप्त करण्यात आला आहे. या ट्रकमध्ये चार ब्रास वाळूची चोरी करण्यात आल्याचे आढळून आले असून तीन लाख छत्तीस हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. जप्त केलेला ट्रक म्हसवड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
माण तालुक्यात माणगंगा ही एकमेव नदी आहे. या शिवाय इतर लहान मोठे ओढे आहेत. कोठेही वाळू उपशाला परवानगी नाही तरीही बेकायदेशीर पणे वाळू उपसा होत आहे. यातूनच बुधवारी रात्री महसूल प्रशासनाने कारवाई केली आहे. माणगंगा नदीवर पळशी, वाकी, वरकुटे, म्हसवड, राऊतवाडी, देवापूर, आदी भागात दररोज वाळू उपसा होत आहे. हा वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल प्रशासनाला कंबर कसावी लागणार आहे.  
प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी व तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत वाकीचे तलाठी संतोष ढोले, वरकुटे - म्हसवड चे पोलीस पाटील अंकुश माने, कोतवाल नितीन मोटे हे सहभागी झाले होते.
रविवारी रात्री माणच्या महसूल विभागाने बेकायदेशीर वाळू उपसा करत असल्याबद्दल कारवाई केलेला तानाजी अंकुश भोसले रा.दिवड हा हिंगणी ता.माण येथील तलाठी मालोजी अंकुश भोसले यांचा सख्खा भाऊ आहे. यामुळे माण मध्ये वाळू उपशाला महसूल विभागाचे पाठबळ असल्याचे दिसून येते.