maharashtra

महाराष्ट्र एकीकरण समिती : बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळाव्याला कडाडून विरोध; कर्नाटक पोलिसांची दंडेलशाही


Maharashtra Ekikaran Samiti : Violent opposition to the Maharastra Ekikaran Samiti convention in Belgaum; The tyranny of the Karnataka Police
Maharashtra Ekikaran Samiti : कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर दूधगंगा नदीवर नाकाबंदी केली आहे. दुसरीकडे, ठाकरे गटाकडून कोल्हापूर ते बेळगाव रॅलीचे आयोजन करण्यात आल्याने कर्नाटक पोलीस सतर्क आहेत.

Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात होणाऱ्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारल्याने सीमावासियांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. कर्नाटक पोलिसांकडून महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकमध्ये प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. दुसरीकडे, बेळगावमध्ये पोलिसांची दडपशाही सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर दूधगंगा नदीवर नाकाबंदी केली आहे. दुसरीकडे, ठाकरे गटाकडून कोल्हापूर ते बेळगाव रॅलीचे आयोजन करण्यात आल्याने कर्नाटक पोलीस सतर्क आहेत.

महाराष्ट्र एकीकरण समितीकडून बेळगावात महामेळाव्याचे आयोजन

महाराष्ट्र एकीकरण समितीकडून बेळगावात आज महामेळाव्याचे आयोजन केलं आहे. कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन सुद्धा आजपासून सुरु होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांच्या मागावर कर्नाटक पोलीस लागले आहेत. अनेक नेत्यांच्या मागे पोलीस बाईकवरुन पाठलाग करत असल्याचे म्हटलं जात आहे. दुसरीकडे, पहाटेपासून धर्मवीर संभाजी महाराज चौकात पहाटेपासूनच पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी कोणताही मोठा नेता पोहोचू नये यासाठी कर्नाटक पोलिसांकडून तयारी करण्यात आली आहे.

कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव येथे महामेळाव्याचे आयोजन केले आहे. सरकारने या मेळाव्याला परवानगी नाकारत अनेक ठिकाणी जमावबंदी आदेश लागू केला आहे. तसेच महाराष्ट्रातील नेते बेळगावमध्ये येऊ नयेत यासाठी सर्व कर्नाटक सीमेवर नाकाबंदी करण्यात आली आहे.