maharashtra

राहुल नार्वेकर : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष;'मी पुन्हा येईन' न म्हणता परत आलात, फडणवीसांचे चिमटे


Rahul Narwekar: Rahul Narwekar again as Assembly Speaker; came back without saying 'I will come again', Fadnavis pinches
Devendra Fadnavis on Rahul Narwekar : नाना पटोलेंचे विशेष आभार, तुम्ही वाट मोकळी केल्यामुळे मागच्या वेळी ते अध्यक्ष बनू शकले, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची फेरनिवड झाली. बिनविरोध निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन प्रस्तावावेळी नार्वेकरांची चौफेर तारीफ केली. मी पुन्हा येईन, असं तुम्ही म्हणाला नव्हतात. पण तरीही आपण परत आलात, याचा आनंद असल्याचं फडणवीस म्हणाले. नाना पटोलेंचे विशेष आभार, तुम्ही वाट मोकळी केल्यामुळे मागच्या वेळी ते अध्यक्ष बनू शकले, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.

फडणवीस काय म्हणाले?

विधानसभेचे सर्व सदस्य आणि महाराष्ट्रातील तमाम १२ कोटी जनतेच्या वतीने राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन करतो. महाराष्ट्रात काही अपवाद वगळता सातत्याने विरोधीपक्ष नेत्याची निवड बिनविरोध करण्याची परंपरा विरोधीपक्षाने राखली आहे. याचा मान राखत आपल्या निवडीला पूर्ण समर्थन दिल्याबद्दल विरोधीपक्षाच्या सर्व सदस्य आणि गटनेत्यांचे आभार मानतो, असं फडणवीस म्हणाले.