maharashtra
छगन भुजबळ यांची भाजपसोबत जवळीक, पवारांसोबत मात्र दुरावा; राजकीय वर्तुळात नव्या अध्यायाचे संकेत?

Political News : महत्त्वाच्या कार्यक्रमात अमित शाह यांच्यासमवेत छगन भुजबळ यांचीही उपस्थिती. राजकारणात नव्या समीकरणाचे संकेत मिळताच असंख्य चर्चांना उधाण.
केंद्रीय गृहमंत्री (Amit Shah) अमित शाह मुंबईत सहकार परिषद घेणार आहेत. या सहकार परिषदेला अमित शाहांसोबत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते छगन भुजबळही उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला छगन भुजबळ काही वेळच उपस्थित होते आणि त्यानंतर ते अधिवेशनातून निघून गेले होते. मात्र भुजबळ अमित शाह यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्यानं त्यांची भाजपसोबतची जवळीक स्पष्टपणे वाढताना दिसतेय. काही दिवसांपूर्वी भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेतली होती. त्यामुळे अजित पवारांसोबत भुजबळांचा दुरावा वाढतोय आणि भाजपसोबत त्यांची जवळीक वाढतेय ही बाब आता दर्शनीय आहे.
राजकीय वर्तुळाय या भेटीगाठी आणि सर्व सत्रांचे अनेक अर्थ काढले जाताहेत, तर्कही लावले जात आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात हे एका नव्या अध्यायाचे संकेत तर नाहीत, अशीही चर्चा सध्या सुरू झाली आहे. तेव्हा येत्या काळात नेमकी ही राजकीय समीकरणं जैसे थे राहतात की, 360 अंशांनी बदलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान अमित शाह हे शुक्रवारी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजाअर्चा करणार आहेत. त्यानंतर ते मालेगावात जाणार असल्याची माहिती आहे.