कॉंग्रेसच्या नेत्यांनी निवडणुकांमध्ये जनतेला भरघोस आश्वासने देऊन खोर्याने मते मिळवली. परंतु पाटण खोर्यातील जनतेकडे साफ दुर्लक्ष केले, अशी टीका महायुतीचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. तसेच देशाची उन्नती साधणार्या भाजप सरकारला सत्ता देण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.
इयत्ता दहावीच्या निरोप समारंभादिवशीच मोटरसायकल व जीपच्या अपघातात मरळी (ता.पाटण) येथील एक विद्यार्थी जागीच ठार झाला. तर अन्य दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले.
मंद्रुळहवेली येथील कोयना नदीत एकजण बुडाला आहे. याबाबत गेल्या तीन दिवसापासून शोधमोहिम सुरू असून अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. मंद्रुळहवेलीच्या यात्रेदिवशीच हा प्रकार झाल्याने नदीकाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
मारूल हवेली, ता. पाटण गावच्या हद्दीत ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याच्या तारेची चोरी झाल्याची तक्रार मल्हार पेठ पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संजीव पांडुरंग मोरे आणि बाबुराव पांडुरंग मोरे या दोन बंधूंनी भुडकेवाडी (वरची), ता. पाटण येथे सोनाई निवास नावाचे घर बांधले आहे. यातील संजीव मोरे हे कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्य करतात तर बाबुराव मोरे सातारा येथे वास्तव्य करतात.
कराड- पाटण मार्गावर विहे घाटातील नहिंबे- चिंरबे गावच्या हद्दीत मारूती सुझूकी कंपनीची डीझायर गाडी रस्ता सोडून चक्क संरक्षक कठड्यावर चढली. या कठड्याच्या दुसऱ्या बाजूला 25 ते 30 फूट खोल भाग होता. परंतु ही गाडी या कठड्यावर जावून थांबली.
पाटण, ता. पाटण येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चार अज्ञात इसमांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पाटण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
पाटण तालुक्यात घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 31 लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची नोंद पाटण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
मतिमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकास न्यायालयाने 10 वर्षे कारावास आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.