कराड- पाटण मार्गावर विहे घाटातील नहिंबे- चिंरबे गावच्या हद्दीत मारूती सुझूकी कंपनीची डीझायर गाडी रस्ता सोडून चक्क संरक्षक कठड्यावर चढली. या कठड्याच्या दुसऱ्या बाजूला 25 ते 30 फूट खोल भाग होता. परंतु ही गाडी या कठड्यावर जावून थांबली.
सातारा : कराड- पाटण मार्गावर विहे घाटातील नहिंबे- चिंरबे गावच्या हद्दीत मारूती सुझूकी कंपनीची डीझायर गाडी रस्ता सोडून चक्क संरक्षक कठड्यावर चढली. या कठड्याच्या दुसऱ्या बाजूला 25 ते 30 फूट खोल भाग होता. परंतु ही गाडी या कठड्यावर जावून थांबली. त्यामुळे सुदैवाने प्रवाशी वाचले. गाडी पाटण येथील व्यावसायिकाची असल्याचे प्राथमिक माहिती आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड- पाटण मार्गावर 0667 सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास चारचाकी गाडी क्र. एमएच- 50- एल- चालकाला घाटातील वळणावर टर्न न बसल्याने संरक्षक कठड्यावर चढली. गाडी कठड्यावर थांबताच प्रवाशी एका बाजूने गाडीतून खाली उतरले. गाडी घाटात कठड्यावर अडकल्याची माहिती मिळताच. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घाटातून प्रवास करणाऱ्या लोकांनी गाडीतील प्रवाशांना आधार दिला.