मंत्रीपदासाठी इच्छुकांची घालमेल! शिंदेंची भेट होत नसल्याने आमदार अस्वस्थ, सागर बंगला बनला आसरामंत्रीपदासाठी इच्छुकांची घालमेल! शिंदेंची भेट होत नसल्याने आमदार अस्वस्थ, सागर बंगला बनला आसरा
एकनाथ शिंदे : मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांची घालमेल सुरू झाली आहे. मंत्रीपदासाठी त्यांनी आता प्रयत्न सुरू केले आहेत. महायुतीतील भाजप सोडून इतर पक्षातील नेते देखील देवेंद्र फडणवीसांची यासाठी भेट घेत असल्याच्या चर्चा आहेत.
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारने मोठं यश मिळवलं आहे. त्यानंतर आता राज्यात मुख्यमंत्री आणि मंत्रीपदाच्या शपथविधीची राज्यात मोठी तयारी सुरू झाली आहे. अशातच आता मंत्रीपद आणि मुख्यमंत्री पदावरून अद्याप महायुतीमध्ये पेच निर्माण झाल्याचं दिसून येत आहेत. एकीकडे महायुतीतील नेत्यांमध्ये मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत आहेत, तर दुसरीकडे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना ताप आणि घशाला संसर्ग झाल्याने डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांनी सर्व बैठका, भेटीगाठी रद्द केल्या आहेत, अशातच मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांची घालमेल सुरू झाली आहे. मंत्रीपदासाठी त्यांनी आता प्रयत्न सुरू केले आहेत. महायुतीतील भाजप सोडून इतर पक्षातील नेते देखील देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) यासाठी भेट घेत असल्याच्या चर्चा आहेत.
दोन-तीन दिवस आपल्या मुळगावी दरे येथे गेलेले राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे रविवारी ठाण्यातील निवासस्थानी परतले. मात्र, अद्याप एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची प्रकृती सुधारली नसल्याची माहिती आहे, त्यांना ताप, सर्दी, घशाला संसर्ग झाल्याची माहिती आहे. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे, त्यामुळे त्यांना कोणालाही भेटण्यास मनाई केली आहे. त्याचबरोबर शिंदे भेटी टाळत असल्याच्या चर्चांसोबत ते नाराज असल्याच्या देखील चर्चा होत्या. त्यानंतर त्यांनी दरे गावात माध्यमांशी संवाद साधत सर्व चर्चांवर आपलं मत स्पष्ट केलं. तर अजित पवार (Ajit Pawar) दिल्लीत आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षातील नेत्यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती आहे. राज्यात महायुतीचे सरकार मोठ्या संख्येने निवडून आलं तरी राज्यातील मुख्यमंत्रिपदाबरोबरच इतर पदांसाठीची रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आजारी पडल्याने त्यांच्या पक्षातील आमदारांसोबतच्या चर्चा सध्या होत नसल्याचं चित्र आहे. सोमवारी आमदार विजय शिवतारे आणि अर्जुन खोपकरदेखील ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले होते. परंतु, डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला असल्याने दोघांचीही भेट झालेली नाही. ते परत गेले. शिंदेंना (Eknath Shinde) भेटण्यासाठी पक्षातील अनेक आमदारांनी प्रयत्न सुरू केले. मात्र, त्यामध्ये त्यांना यश आलं नाही. त्यामुळे आता काही नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्याचा आसरा घेतला आहे.एकनाथ शिंदे ठाण्यात तर अजित पवार दिल्लीत
मुख्यमंत्रिपदाबरोबरच इतर पदांसाठीची रस्सीखेच
सागर बंगला बंगला इच्छुक आमदारांसाठी बनला आसरा
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल आझाद मैदान येथे होणाऱ्या शपथविधी सोहळ्याच्या तयारी ठिकाणी जावून पाहणी केली. त्यानंतर ते सागर बंगल्यावर फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाले. महायुती सरकारमध्ये मंत्री राहिलेले चचानती पाटील, अतुल सावे, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, यांच्यासह मावळते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ, नारायण कुचे, प्रतापराव चिखलीकर, चित्रा वाघ, संजय कुटे, राहुल कुल, रणजित सावरकर, राणा जगजितसिंह पाटील, मेघना बोर्डीकर, अनिल बोंडे, मुरजी पटेल त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे, मोहित कंबोज, या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी देखील काल (सोमवारी) देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. म्हात्रे यांच्या भेटीने चर्चा सुरू झाल्या आहे.