maharashtra

महाराष्ट्रातील 110 फूट खोल विहीरीत गुप्त राजवाडा; 300 वर्षात एकदाही आटले नाही या विहीरीचे पाणी


110 feet deep well secret palace in Maharashtra; The water of this well has not dried up even once in 300 years
साताऱ्यातील ऐतिहासिक बारा मोटेची विहीर विहीर : महाराष्ट्रातील बारा मोटेची विहीर ही इतिहास स्थापत्यकलेचा अदभुत नमूना आहे. ही विहीर पाहण्यास देशभरातून पर्यटक गर्दी करतात.

साताऱ्यातील ऐतिहासिक 
बारा मोटेची विहीर
:  भव्य गड किल्ले हे महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार आहेत. याचप्रकारे महाराष्ट्राला अनेक ऐतिहासिक वास्तूंचा वारसा लाभलेला आहे. अशीच एक ऐतिहासीक वास्तू सातारा जिल्ह्यात आहे. या वास्तू म्हणजे एक विहीर आहे. ही विहीर सर्वसधारण विहीरीप्रमाणे नसून या 110 फूट खोल विहीरीत आहे भव्य राजवाडा बांधण्यात आलेला आहे. जाणून घेऊया या विहीरी विषयी.  


छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या पत्नी वीरूबाई यांच्या देखरेखीखाली या विहिरीचे बाधकाम पूर्ण झाले होते. 1719 ते 1724  या कालावधीत छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नी वीरुबाई भोसले यांनी ही विहीर बांधली होती.  110 फूट खोल आणि 50 फूट व्यास असलेली ही विहीर आमराईला पाणी पुरवठा करण्यासाठी बांधण्यात आली. 3300 आंब्यांच्या झाडांना यातून पाणीपुरवठा करण्यासाठी ही विहीर खोदण्यात आली होती. या विहिरीतून पाणी उपसण्यासाठी एकावेळी 12 मोटा लावल्या जात. यामुळे ही विहीर बारा मोटेची विहीर या नावाने ओळखली जाते.