धनगर आरक्षणासाठी खंडाळ्यात काल पुणे-बंगळूर महामार्ग रोको करण्यात आला. त्यामुळे पुणे आणि सातारा बाजूकडे पंधरा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक मागील अडीच तासापासून ठप्प झाली. धनगर आरक्षणासाठी समाजाच्या वतीने महामार्ग रोखण्याचा इशारा देण्यात आला होता. त्याप्रमाणे खंडाळा येथे रास्ता रोको करण्यात आला.
पुणे -बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळा गावच्या हद्दीमध्ये बाळूमामाच्या मेंढरांचे दर्शन घेऊन परतणा-या भाविकांच्या कारने महामार्गालगत अवैधरित्या थांबलेल्या मालट्रकला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत महिलेसह दहा वर्षाचा मुलगा जागीच ठार झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
लोणंद येथील सुमारे 21 तोळे सोन्याच्या दागिन्यांच्या घरफोडीची उकल करण्यात लोणंद पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी त्यांनी चोरांसह सोनारालाही ताब्यात घेतले आहे.
हाताची नस कापून विषारी औषध प्राशन केल्याने लोणंद, ता. खंडाळा येथील एका युवतीचा मृत्यू झाल्याची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात झाली आहे.
पुणे येथील भिडे वाडा येथे स्मारक उभारणीबाबत सर्वबाबींची पुर्तता करुन दोन महिन्यात स्मारकाचे भूमिपूजन केले जाईल. या स्मारकाच्या माध्यमातून अनेकांना समाजकार्याची प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
बोअरवेल मशीनच्या ट्रकमधून खाली पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना शिरवळ, ता. खंडाळा गावच्या हद्दीत घडली.
खंडाळा तालुक्यातील मोर्वे-वाघोशी रस्त्यावर मराठा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद कोंडे हे आपल्या चारचाकी वाहनाने प्रवास करत असताना त्यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. ही घटना मंगळवारी दुपारी सव्वा च्या दरम्यान घडली.
दोन कंटेनर चालकांमध्ये पत्नीच्या चारित्र्याविषयी बोलण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात शिवानंद पुजारी याने स्वप्निल गीते यांच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले होते. यामध्ये गीतेचा जागीच मृत्यू झाला होता. शिवानंद जगन्नाथ पुजारी याला शिरवळ पोलिसांनी बारा तासात जेरबंद केले.
गेले चार वर्षांपासून फरार असलेला मोका, जबरी चोरीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस लोणंद पोलिसांनी गजाआड केले. बापू कल्याण शिंदे, रा. सुरवडी, ता. फलटण असे या अटक केलेल्याचे नाव आहे.
खंडाळा, ता. खंडाळा गावच्या हद्दीत पाय घसरून विहिरीत पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.