maharashtra

हाताची नस कापून विषारी औषध प्राशन केलेल्या युवतीचा मृत्यू


हाताची नस कापून विषारी औषध प्राशन केल्याने लोणंद, ता. खंडाळा येथील एका युवतीचा मृत्यू झाल्याची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात झाली आहे.

सातारा : हाताची नस कापून विषारी औषध प्राशन केल्याने लोणंद, ता. खंडाळा येथील एका युवतीचा मृत्यू झाल्याची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ३१ डिसेंबर २०२२ रोजी ७.३० वाजण्याच्या सुमारास श्रद्धा अनिल परदेशी, वय २२, रा. लोणंद, ता. खंडाळा या युवतीने हाताची नस कापून, विषारी औषध प्राशन केल्याने तिला लोणंद येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असताना दि.२ रोजी १२ वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाल्याची खबर डॉ. दीपक गोरड यांनी लोणंद पोलीस ठाण्यात दिली.