मोठी बातमी: आशिष शेलारांकडून मुंबई अध्यक्षपद काढलं;मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची नियुक्ती
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. भाजपने मुंबई भाजपचा अध्यक्ष बदलला आहे, अमित साटम यांची नियुक्त
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. भाजपने मुंबई भाजपचा अध्यक्ष बदलला आहे, अमित साटम यांची नियुक्ती
नवीन अध्यक्ष कोण?
मुंबईच्या अध्यक्षपदावर भाजपाने अमित साटम यांची नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी भगवी शाल खांद्यावर टाक साटम यांच्याकडे ही नवी जबाबदारी सुपूर्द केली. साटम यांनी गेली अनेक वर्षे मुंबईच्या पश्चिम उपनगरात नगरसेवक आणि आमदार म्हणून काम केले आहे. अमित साटम हे तीनवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांना मुंबईतील नागरी प्रश्नांची चांगली जाण आहे. अमित साटम यांनी विधानसभा आणि विविध व्यासपीठांवर भाजपची बाजू आक्रमकपणे मांडण्याचे काम केले आहे. या सगळ्यामुळे भाजप नेतृत्त्वाने त्यांच्या खांद्यावर मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याचे सांगितले जात आहे.
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
अमित साटम यांची मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आशिष शेलार यांनी मुंबई विभागाचे अध्यक्षपद समर्थपणे सांभाळले. 2017 च्या निवडणुका असतील, आत्ताच्या निवडणुका त्यांनी उत्तम काम केलं. मंगलप्रभात लोढा यांनी उत्तम रितीने कार्यभार सांभाळला. पुन्हा आशिष शेलार यांच्याकडे धुरा आली, विधानसभेत चांगले यश मिळाले. मुंबईतील नंबर एकचा पक्ष म्हणून सिद्ध केलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नव्या संघटनात्मक रचनांकडे अमित साटम यांच्याकडे भार आलाय. अमित साटम तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेत, नगरसेवक होते. प्रदीर्घ कार्यकाळ राहिला आहे. संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. अभ्यासू आणि आक्रमक अशी अमित साटम यांची प्रतिमा आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. मुंबईच्या राजकारणाची जाण आणि कल्पकता त्यांच्याकडे आहे. येत्या काळात त्यांच्या नेतृत्वाखालील भाजप मुंबईत घोडदौड राखेल, असा विश्वासही देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. पुन्हा महायुतीची मुंबईत सत्ता येईल हा विश्वास आहे. सर्व संघटनात्मक जबाबदाऱ्या ते चांगल्या पद्धतीनं पार पडतील. सर्व ज्येष्ठ नेते त्यांच्या पाठीमागं आहेत. अमित साटम यांना शुभेच्छा देतो, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.


