deshvidesh

भीमपराक्रमासाठी भारत सज्ज! उरली 'इतकी' वर्षं; चंद्र- पृथ्वीशी थेट संबंध, 'इस्रो'नं सांगितले मोहिमेचे महत्त्वाचे टप्पे


India is ready for Bhimparakram! 'So many' years left; Direct connection with Moon and Earth, ISRO announced the important milestones of the mission
ISRO Mission Moon : भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रात पुढच्या 10 वर्षांमध्ये नेमकं काय घडणार? चीनमागोमाग भारत करणार जगाचे डोळे दीपवणारं काम.... इस्रोनं सविस्तर माहिती देत काय म्हटलंय पाहाच...

ISRO Mission Moon : (Chandrayaan 3) चांद्रयान 3 मोहिमेमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात (ISRO) इस्रोला अपेक्षित यश मिळाल्यानंतर आता ही संस्था नवा किर्तीमान रचण्यासाठी सज्ज झाली आहे. संपूर्ण जगाला पुन्हा एकदा अवकाश मोहिमांमध्ये असणारी आपली पकड दाखवून देण्यासाठी म्हणून ISRO पुन्हा एकदा काही नव्या मोहिमांसह सज्ज झालं आहे. त्याच धर्तीवर आगामी आर्थिक वर्षात इस्रोकडून अवकाशात 7 उपग्रहाचं प्रक्षेपण प्रस्तावित आहे. तर, 2027 मध्ये देश एक भीमपराक्रम करताना दिसेल. ज्यामुळं जगभरातील अंतराळसंशोधन संस्थांना ही भारतानं दाखवून दिलेली ताकदच ठरणार आहे. 

अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार 2027 पर्यंत भारताकडून अंतराळवीरांना अवकाशात नेणारं यान तयार केलं जाणार असून, त्यासाठीची तयारीसुद्धा सुरू करण्यात आली आहे. इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी एका मुलाखखतीदरम्यान ही माहिती देत सदर संस्था अवकाशयान उत्पादन क्षमतेत तिपटीनं वाढ करणार असल्याचं स्पष्ट केलं. PTI या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना नारायणन यांनी इस्रोची औद्योगिक क्षमता झपाट्यानं वाढत असून, आगामी 7 प्रक्षेपणांमध्ये एक कमर्शिअल कम्युनिकेशन सॅटेलाईट आणि अनेक पीएसएलवी (PSLV), जीएसएलवी (GSLV) मोहिमा असतील असं सांगितलं. 

भारतीय तंत्रज्ञनावरच उभी असेल संपूर्ण मोहिम... 

संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आखलेल्या आणि प्रत्यक्षात अमलात आणलेल्या अंतराळ मोहिमांमुळे जगावर छाप सोडणारा भारत 2028 पर्यंत 'चांद्रयान-४' मोहीम अमलात आणण्याच्या तयारीत आहे. ज्यासाठी इस्रोच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनंही मंजुरी दिली आहे. या मोहिमेअंतर्गत चंद्रावरील काही नमुने पृथ्वीवर संशोधनासाठी आणण्यात येतील. 

२०३५ पर्यंत अवकाशात भारताचं 'स्पेस स्टेशन'

नारायणन यांच्या माहितीनुसार, 2023 पर्यंत भारत आपलं अंतराळ स्थानक उभारण्याच्या दिशेनं मोठी पावलं उचलणार असून, त्यासाठीच्या कामास सुरूवातही झाली आहे. या प्रक्रियेतील पाच मॉड्यूलपैकी पहिलं मॉड्यूल 2028 मध्ये पृथ्वीकक्षेत स्थापित केलं जाईल. यामुळं भारत असं चौथं राष्ट्र ठरेल ज्याच्याकडे स्वत:चा अवकाश तळ आहे. सध्या अमेरिका, चीन, रशिया यांची अंतराळ स्थानकं असून या रांगेत आता भारताचाही समावेश असेल. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार 2027 पर्यंत भारताकडून अंतराळवीरांना अवकाशात नेणारं यान तयार केलं जाणार असून, त्यासाठीची तयारीसुद्धा सुरू करण्यात आली आहे. इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी एका मुलाखखतीदरम्यान ही माहिती देत सदर संस्था अवकाशयान उत्पादन क्षमतेत तिपटीनं वाढ करणार असल्याचं स्पष्ट केलं. PTI या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना नारायणन यांनी इस्रोची औद्योगिक क्षमता झपाट्यानं वाढत असून, आगामी 7 प्रक्षेपणांमध्ये एक कमर्शिअल कम्युनिकेशन सॅटेलाईट आणि अनेक पीएसएलवी (PSLV), जीएसएलवी (GSLV) मोहिमा असतील असं सांगितलं. 

भारतीय तंत्रज्ञनावरच उभी असेल संपूर्ण मोहिम... 

संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आखलेल्या आणि प्रत्यक्षात अमलात आणलेल्या अंतराळ मोहिमांमुळे जगावर छाप सोडणारा भारत 2028 पर्यंत 'चांद्रयान-४' मोहीम अमलात आणण्याच्या तयारीत आहे. ज्यासाठी इस्रोच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनंही मंजुरी दिली आहे. या मोहिमेअंतर्गत चंद्रावरील काही नमुने पृथ्वीवर संशोधनासाठी आणण्यात येतील. 

२०३५ पर्यंत अवकाशात भारताचं 'स्पेस स्टेशन'

नारायणन यांच्या माहितीनुसार, 2023 पर्यंत भारत आपलं अंतराळ स्थानक उभारण्याच्या दिशेनं मोठी पावलं उचलणार असून, त्यासाठीच्या कामास सुरूवातही झाली आहे. या प्रक्रियेतील पाच मॉड्यूलपैकी पहिलं मॉड्यूल 2028 मध्ये पृथ्वीकक्षेत स्थापित केलं जाईल. यामुळं भारत असं चौथं राष्ट्र ठरेल ज्याच्याकडे स्वत:चा अवकाश तळ आहे. सध्या अमेरिका, चीन, रशिया यांची अंतराळ स्थानकं असून या रांगेत आता भारताचाही समावेश असेल.