आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. दागिने खरेदी करायला जाण्यापूर्वी वाचा आजचा सोन्याचा दर
आजचा सोन्याचा दर:आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात मोठे उलटफेर पाहायला मिळाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरांत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. त्यामुळं ऐन लग्नसराईच्या दिवसांत ग्राहकांपुढे मोठा पेच निर्माण झाल्याचे पाहायला मिळतेय. आजदेखील सोन्याचे दर किंचितसे वधारले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी आणि डॉलरचे ढासळलेले मुल्य याचा परिणाम सोन्याच्या दरांवर होताना दिसतोय.
सोन्याच्या दरात आज किंचितशी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात मात्र घट झाली आहे. एक किलो चांदीच्या दरात आज साधारण 4000 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळं एक किलो चांदीचा दर 187000 रुपये प्रति किलोवर स्थिरावला आहे. तर, 24 कॅरेट सोन्याच्या दरात आज 270 रुपयांची वाढ झाली आहे त्यामुळं प्रतितोळा सोनं 1,29,930 रुपयांवर स्थिरावलं आहे.
आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 270 रुपयांची वाढ झाल्यामुळं 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,29,930 रुपये इतका आहे. तर, 22 कॅरेट सोन्याच्या दरात 250 रुपयांची वाढ झाली असून 1,19,100 रुपयांवर स्थिरावले आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 210 रुपयांची वाढ झाली असून 97,450 रुपयांवर स्थिरावले आहे.
आजचा सोन्याचा भाव काय?
- 10 ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,19,100 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,29,930 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 97,450 रुपये
- 1 ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 11,910 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 12,993 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 9,745 रुपये


