deshvidesh

डोनाल्ड ट्रम्प : संपूर्ण जगाने ज्यासाठी इतकी वर्षे प्रयत्न केले ते सगळं केरात जाणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक धक्कादायक निर्णय


Donald Trump: Everything that the whole world has worked for for so many years will go to waste, another shocking decision of Donald Trump
Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कागदी स्ट्रॉच्या सरकारी वापरावर बंदी घालण्याच्या निर्णयावर नुकतीच स्वाक्षरी करत मोठा निर्णय घेतला आहे.

Donald Trump :  'कागदी स्ट्रॉ वापरण्याची परिस्थिती हास्यास्पद आहे. आम्ही पुन्हा प्लास्टिक स्ट्रॉचा वापर सुरू करत आहोत' असा शेरा देत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कागदी स्ट्रॉच्या सरकारी वापरावर बंदी घालण्याच्या निर्णयावर नुकतीच  स्वाक्षरी करत मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी संस्थांनी कागदी स्ट्रॉ विकत घेणे थांबवावे, तसेच सरकारी संस्थांच्या इमारतीमध्येही त्यांचा पुरवठा केला जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी. असे आदेश डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून देण्यात आले आहे.

कागदी स्ट्रॉचा काही उपयोग होत नाही आणि तो जास्त काळ टिकत नाहीत असे कारण देत ट्रम्प यांनी स्ट्रॉच्या सरकारी वापरावर बंदी घालण्याच्या निर्णय दिला आहे. त्याऐवजी अमेरिकी सरकारने केवळ प्लास्टिक स्ट्रॉचाच वापर केला पाहिजे, असे ही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेल्या आदेशामुळे आता पेपर स्ट्रॉच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या आणि प्लास्टिकचा वापर मर्यादित करण्याचे माजी अध्यक्ष जो बायडेन यांचे धोरण पूर्णपणे उलट फिरवण्यात आल्याच्या अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. 

स्थलांतरितावरून पोप फ्रान्सिस यांची टीका

रोम : स्थलांतरितांना जबरदस्तीने देशाबाहेर काढण्याच्या धोरणाचे परिणाम वाईट होतील, असा इशारा देत पोप फ्रान्सिस यांनी घणाघाती टीका केली आहे. अमेरिकेतील बेकायदा स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्याच्या निर्णयावर पोप यांनी भाष्य केलं आहे. पोप फ्रान्सिस यांनी मंगळवारी ही टीका केली असून अमेरिकेच्या बिशपना लिहिलेल्या पत्राद्वारे त्यांनी राष्ट्रांना स्वतःचे संरक्षण कर आणि गुन्हेगारांपासून समाज सुरक्षित ठेवण्याचा अधिकार आहे, असे मतही पोप यांनी पत्रात व्यक्त केले आहे.

प्लास्टिकविषयी बायडेन यांचे धोरण काय?

बायडेन प्रशासनाच्या धोरणानुसार, 2027 पर्यंत सरकारी वापरासाठी खाण्यापिण्याशी संबंधित विभागांमधून आणि 2035पर्यंत सर्व सरकारी विभागांमधून स्ट्रॉसह एकल-वापर प्लास्टिकची खरेदी टप्प्याटप्याने बंद केला जाणार होता. बायडेन यांचे धोरण मृत असल्याचे ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर जाहीर केले होते. दरम्यान, पेपर स्ट्रॉच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या आणि प्लास्टिकचा वापर मर्यादित करण्याचे माजी अध्यक्ष जो बायडेन यांचे धोरण डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पूर्णपणे उलट फिरवण्यात आले आहे.