एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी दुचाकी चालकावर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मेढा, ता. जावली येथे पहाटेच्या सुमारास झालेल्या खुनाची उकल स्थानिक गुन्हे शाखेने केवळ बारा तासात केली आहे. याप्रकरणी दोघा जणांना जेरबंद करण्यात त्यांना यश आले आहे.
कुडाळ, तालुका जावळी येथील स्वामी मंगल कार्यालयाच्या समोर उघड्या जागेमध्ये जुगार अड्डा चालवणाऱ्या सात जणांवर मेढा पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 प्रमाणे तक्रारीची नोंद करण्यात आली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गवडी, ता. जावली गावाच्या हद्दीमध्ये बौद्ध वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुटखा व पान मसाला विक्री करताना मेढा पोलीसांनी कारवाई करत २ लाख १९ हजार १०० रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
अपघातात दोघांना जखमी केल्याप्रकरणी एकावर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कुडाळ, तालुका जावळी येथील युवा लघु चित्रपट निर्माते दिग्दर्शक अरीश इम्तियाज मुजावर यांना zeff प्लस इंटरटेनमेंटच्या तर्फे आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये आर. जे. केराबाई ही डॉक्युमेंटरी नामांकित होऊन हरीश मुजावर यांना आज पुणे येथे गौरविण्यात आले.
जावली तालुक्यातील बोंडारवाडी धरणासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, त्यासाठी आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करावे लागले तरी चालेल, मी तुम्हाला तुमच्या हक्काचे धरण मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. यासाठी मला तुमची शेवटपर्यंत साथ हवी, असे आवाहन श्रमिक मुक्तीदलाचे प्रणेते व धरणग्रस्त संघटनेचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी ५४ गावच्या नागरिकांना केले.
महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष यांच्या सुचेनुसार व जावळी तालुकाध्यक्ष एस. ए.सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जावली तालुका संघटनेचे सरचिटणीस डी. एन. आंबवणे व कार्याध्यक्ष एस. व्ही. ढाकणे यांच्या नेतुत्वाखाली मेढा येथील तहसील कार्यालयासमोर तालुका तलाठी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले, तसेच निदर्शनेही करण्यात आली.
जावळी तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. प्रशासन आपापल्या परीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहे.