maharashtra

मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा


एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी दुचाकी चालकावर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी दुचाकी चालकावर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 19 जानेवारी रोजी साडेआठ वाजण्याच्या सुमारास दापवडी गावच्या हद्दीत कुडाळ - पाचगणी रस्त्यावर गणपत शंकर रांजणे राहणार दापोडी तालुका जावली हे कमानी जवळ उभे असताना निलेश राजेंद्र गुजर रा. कुडाळ, ता. जावली याने त्याच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एमएच 45 एए 3269 भरधाव वेगात चालवून रांजणे यांना धडक दिली. उपचार सुरू असताना रांजणे यांचा मृत्यू झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार बाबर करीत आहेत.