maharashtra

तनिषा भिसे मृत्यू प्रकरण: तनिषा भिसेंच्या कुटुंबियांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची 5 लाखांची आर्थिक मदत नाकारली; केली 'ही' मोठी मागणी


Tanisha Bhise death case: Tanisha Bhise family rejects Deputy Chief Minister's financial assistance of Rs 5 lakh; 'This' fine
Tanisha Bhise Death Case : पैसे नको पण दीनानाथ रुग्णालयातील चुकीच्या लोकांवर कारवाई करा आणि पुन्हा अशा घटना घेऊ नये यासाठी प्रयत्न करा अशी मागणी सुशांत भिसे यांनी केली आहे.

पुण्यातील गर्भवती माता मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मृत तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आर्थिक रक्कम नाकारली आहे. काल (बुधवारी) शिवसेना वैद्यकीय कक्षाचे मंगेश चिवटे यांनी भिसे कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेंकडून कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून पाच लाख रुपये देण्यात येत होते. मात्र, ईश्वरी भिसे यांचे पती सुशांत भिसे यांनी आर्थिक मदत नाकारली असल्याची माहिती समोर आली आहे. पैसे नको पण दीनानाथ रुग्णालयातील चुकीच्या लोकांवर कारवाई करा आणि पुन्हा अशा घटना घेऊ नये यासाठी प्रयत्न करा अशी मागणी सुशांत भिसे यांनी केली आहे. या आधी ही चंद्रकात पाटील यांच्या कडून एक लाख रुपयांची मदत देण्यात आली होती पण ती भिसेनी नाकारली आहे. 

उपमुख्यमंत्री शिंदेंची आर्थिक मदत भिसे कुटुंबाने नाकारली

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गर्भवती महिलेच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली होती. मात्र, ती मदत भिसे कुटुंबियांनी नाकारली आहे. या आधीही भिसे कुटुंबियांना चंद्रकांत पाटील यांच्याकडून एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली होती. ती मदत देखील भिसे कुटुंबियांनी नाकारली होती.

पैसे नको, रुग्णालयातील चुकीच्या लोकांवर कारवाई करा - भिसे कुटुंब

एकनाथ शिंदेंच्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे यांनी भिसे कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून पाच लाख रुपये देण्यात येत होते. पण ते भिसे कुटुंबियांनी नाकारले. ही आर्थिक मदत नाकारत त्यांनी आम्हाला पैसे नको, पण दिनानाथ रुग्णालयातील चुकीच्या लोकांवर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. तसंच यापुढे कधीही अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रयत्न करा अशी विनंतीही गर्भवती महिलेच्या कुटुंबियांनी केली आहे.

आर्थिक रक्कम नाकारण्यामागे भिसे कुटुंबाने दिलं कारण

गर्भवती महिलेच्या मृत्यूच्या घटनेनंतर अनेकांनी त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची इच्छा दाखवली होती. एकनाथ शिंदे यांनीही कुटुंबाला 5 लाखांची रक्कम देण्याचं ठरवलं होतं. पण, कुटुंबाने ही आर्थिक मदत घेण्यास नकार दिला. आर्थिक मदत नाकारण्यामागे कुटुंबाने कारणही दिलं आहे. यापुढे अशा घटना घडू नये यासाठी काळजी घ्या. पैसे नको, तर अशा घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न करा. तसेच आता दिनानाथ रुग्णालयात डॉक्टरांनी राजीनामा दिला असला तरी रुग्णालयातील चुकीच्या लोकांवरती कारवाई करावी, चुकीच्या डॉक्टर आणि रुग्णालयावर कारवाई करावी, अशी मागणी भिसे कुटुंबाने यावेळी केली आहे.