deshvidesh

कोणत्या देशात तब्बल 76 दिवस सूर्य मावळाच नाही? आहे सर्वात श्रीमंत देशांपैकी एक!


In which country does the sun not set for 76 days? It is one of the richest countries!
तिथे जवळपास तीन महिने सूर्य उगवत नाही. हा देश नेमका कोणता आहे आणि तिथे कशी जीवन आहे याबद्दल अधिक जाणून घ्या.
नॉर्वे राजनैतिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असला तरी या देशाची जगभरात वेगळी ओळख आहे ती एका अनोख्या नैसर्गिक घटनेमुळे.

 मध्यरात्रीही सूर्य दिसणारा देश
नॉर्वेला ‘लँड ऑफ मिडनाइट सन’ म्हणजेच 'मध्यरात्रीही सूर्य दिसणारा देश' म्हणून ओळखले जाते. कारण येथे वर्षातील काही महिन्यांत सूर्य मावळतच नाही. रात्री १२ वाजताही आकाशात दिवसासारखा उजेड असतो.

 नॉर्वेमध्ये सूर्य का मावळत नाही?
नॉर्वे पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाजवळ स्थित असल्यामुळे येथे ही विलक्षण घटना घडते. मे ते जुलै दरम्यान जवळपास ७६ दिवस सूर्य क्षितिजाखाली जात नाही. पृथ्वीच्या झुकलेल्या अक्षामुळे उत्तर ध्रुवीय भागावर सतत सूर्यप्रकाश पडत राहतो आणि त्यामुळे येथे रात्रच होत नाही.
जून महिन्यात परिस्थिती आणखी वेगळी
विशेषतः जून महिन्यात परिस्थिती आणखी वेगळी असते. संपूर्ण २४ तासांपैकी फक्त ३० ते ४० मिनिटेच थोडासा अंधुकपणा जाणवतो. उर्वरित वेळ पूर्ण उजेड असतो.
लोकांचं जीवनही वेगळंच!
सतत उजेड असल्यामुळे येथील लोकांची जीवनशैलीही इतर देशांपेक्षा खूप वेगळी आहे. रात्री उशिरापर्यंत लोक रस्त्यावर फिरताना, पार्कमध्ये खेळताना किंवा काम करताना सहज दिसतात. दिवस आणि रात्रीतील फरक जवळपास संपून जातो.

झोपेच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम
पर्यटकांसाठी ही गोष्ट सुरुवातीला रोमांचक वाटली तरी झोपेच्या वेळापत्रकावर त्याचा मोठा परिणाम होतो. त्यामुळे नॉर्वेमधील बहुतांश घरांमध्ये खिडक्यांना जाड आणि गडद रंगाचे पडदे लावलेले असतात, जेणेकरून खोलीत कृत्रिम अंधार निर्माण करता येईल.
काही महिने पूर्ण अंधारही
ज्या देशात काही काळ सूर्य मावळत नाही, तिथे वर्षातील काही महिने सूर्य उगवतही नाही. नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान नॉर्वेतील अनेक भागांमध्ये सूर्यप्रकाश जवळपास दिसत नाही. या काळात दिवस अत्यंत लहान आणि वातावरण पूर्ण अंधारमय असते.

जगातील श्रीमंत आणि शांत देशांपैकी एक
नॉर्वे हा जगातील सर्वात श्रीमंत आणि विकसित देशांपैकी एक मानला जातो. सुमारे ३.८५ लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या या देशाची लोकसंख्या अवघी ५४ लाखांच्या आसपास आहे. त्यामुळे येथे गर्दी कमी आणि शांत वातावरण अधिक पाहायला मिळते. नैसर्गिक सौंदर्य, स्वच्छता, उच्च जीवनमान आणि अनोख्या भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे नॉर्वे जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे.