सध्या होणारी टोल वसुली आणि टोल देऊन प्रवासाचे होणारे हाल याच विदारक चित्र
सातारा : माणसं पण मरुद्या, टोल पण मिळुद्या अशी अवस्था आता संपूर्ण भारतात झाली आहे, आताचे होणारे हायवे तसेच मोठे रस्ते बांधा वापर आणि हस्तांतरित करा या उद्धेशाने सुरु होतात पण पुढे जाऊन बांधा पण आणि हस्तांतरित करा पण हे दोन्ही सरकार आणि हायवे बांधकाम करणारी कंपनी दोघे पण विसरून जाताना दिसून येत आहेत . कित्तेक टोल नाके मुदत संपून काहीतरी फुसकट कारण कडून पुढं जसे च्या तसे वाढीव दराने कित्तेक वर्ष सुरु आहेत . त्याबद्दल ना लोकप्रतिनिधी काही बोलत ना सरकार आणि नागरिकांना तर बोलायचे अधिकारच नाही अशी अवस्था सध्या सुरु आहे. नागरिकांना टोल पण द्या आणि साई सुविधां बद्दल बोलू पण नका असे धोरण आता सध्या अस्तित्वात आहे. कित्तेक ठिकाणी धोक्याची वळणे, मधेच पुलाची रुंदी कमी, तर तीव्र उतार असे चुका होत आहेत. या चुका पण अशा आहेत कि जणू कि जाणीवपूर्वक केलेल्या असलेसरख्या यात कित्तेक लोकांचे जीव पण गेले आहेत. त्या चुका दुरुस्त करणेसाठी पुन्हा काम आणि पुन्हा वेगळी चूक असे रहाटगाडगे पुन्हा पुन्हा सुरु आहे. सुरुवातीला चार लेन , पुन्हा सहा लेन रस्ता तोच काम सुरु आणि टोल दार वाढवून सुरूच काम काही संपत नाही आणि टोल पण काही बंद होत नाहीत. एवढे करून जीव वाचतायत, वेळ वाचतोय तर याचे उत्तर नाहीच आहे जरी रस्ते चांगले झाले तरी टोल सरही असणाऱ्या रांगा पुढे जाऊन ट्राफिक जाम अशी वेगवेगळी कारणे. त्यात कमी म्हणून जागोजागी स्पीड चेकिंग कॅमेरे कोठी किती स्पीड यातच वाहन चालक गोंधळून जात आहे एकच रस्त्यावर ४०,६०,८०,९० असे वेगवेगळ्या वेग मर्यादा, त्याच्यापुढे जाऊन टोल नाक्यावर असणारे ट्राफिक पोलीस जसे काही आतंकवादी किंवा दरडेखोर पकडणेसाठी सज्ज असलेसारखे रस्त्याच्या मधोमध उभे असतात त्यातून वाहनधारकांची पिळवूणक वेगळीच वरील सर्व अवस्था पाहून पुन्हा एकदा सरकारी धोरण माणसं पण मरुद्या, टोल पण मिळुद्या ! असेच असलेचा भास निर्माण होत आहे.


