deshvidesh

इस्रायल इराण अमेरिका युद्ध : पुण्यातील नामांकित विद्यालयाचे 84 जण दुबईमध्ये अडकले, , लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू


Israel Iran America war: 84 students from a renowned school in Pune are stranded in Dubai, efforts are underway to bring them to India as soon as possible
84 मुले दुबई मध्ये अडकले आहेत. हे विद्यार्थी ग्लोबल इमर्शन कार्यक्रमासाठी गेले होते,सगळे विद्यार्थी सुखरूप आहेत.

 पुण्यातील नामांकित विद्यालयाचे ८४ जणं दुबईमध्ये अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. ८४ जणांमध्ये ८० विद्यार्थी आणि ४ शिक्षकांचा समावेश आहे. पुण्यातील नामांकित विद्यालयाचे सर्व विद्यार्थी सुरक्षित (Israel Iran US War) असल्याची माहिती समोर आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून पुण्यातील विद्यार्थ्यांना लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुण्यातील नामांकित विद्यालयाचे विद्यार्थी "स्टडी व्हिसिट" साठी दुबई (Israel Iran US War) येथे गेले होते. कृपया कोणी ही घाबरून जाऊ नये, विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मायदेशात आणले जाणार आहे असं आवाहन महाविद्यालयाकडून करण्यात आलं आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून सुद्धा विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.(Israel Iran US War)

महाविद्यालयाचे डीन जनार्दन पवार, यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, सगळे विद्यार्थी सुखरूप आणि सुरक्षित आहेत. 42 मुलं आणि 42 मुली असा 84 जणांचा विद्यार्थ्यांचा समूह दुबई येथे गेला होता. आम्ही या विद्यार्थ्यांच्या पालकांशी आणि दुबईमध्ये असलेल्या सगळ्या शिक्षकांशी सुद्धा संपर्कात आहोत. विद्यार्थ्यांना आणि पालकांना घाबरून न जाण्याचा आवाहन आहे. परराष्ट्र मंत्रालय तसंच भारतीय दूतावासासोबत महाविद्यालयाशी बोलणी सुरू आहे.(Israel Iran US War) 

84 मुले दुबई मध्ये अडकले आहेत. हे विद्यार्थी ग्लोबल इमर्शन कार्यक्रमासाठी गेले होते,सगळे विद्यार्थी सुखरूप आहेत. त्या ठिकाणी असलेली विद्यार्थी आणि आमच्या कॉलेजचा स्टाफ तिथे आहे त्यांच्या सोबत आमचा संपर्क झाला आहे,विद्यार्थीच्या पालक पण आमच्या संपर्कात आहे. ह्या कार्यक्रमासाठी 42 मुल आणि 42 मुली त्या कार्यक्रमासाठी गेले होते,हे सर्व विद्यार्थी संपर्कात आहेत, आमच्या युनिव्हर्सिटी कडून विदेश मंत्रालयांसोबत बोलणं सुरू आहे आमचं निवेदन पोहोचला आहे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासोबतही आमचं बोलणं झालं आहे. दुबईमधील भारतीय दूतावास कार्यालयासोबतही आमच बोलणं झाला आहे, घाबरून न जाण्याचे आवाहन पालकांना करत आहोत.(Israel Iran US War)

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू 

अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Ali Khamenei) यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केला.  तर दुसरीकडे शनिवारी (28 फेब्रुवारी 2026) इस्रायल आणि अमेरिकेने इराणी राष्ट्रपती भवनासह अनेक ठिकाणी हल्ला केला. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने आखाती देशांमधील, तेल अवीवमधील आणि इस्रायलमधील इतर ठिकाणी असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. आतापर्यंत या हल्ल्यांमध्ये इराणमध्ये सुमारे 200 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ज्यात 85 शाळकरी मुलींचाही समावेश आहे. (Iran Supreme Leader Ali Khamenei Death News) दरम्यान, इस्रायली हल्ल्यात इराणचे संरक्षण मंत्री अमीर नासिरजादेह आणि अनेक आयआरजीसी कमांडर मारले गेल्याचे दावेही केले जात आहेत. इस्रायलने म्हटले आहे की, इराणी राजवट उलथवून टाकण्याच्या उद्देशाने केलेल्या या कारवाईची तारीख काही आठवडे आधीच निश्चित करण्यात आली होती.

Iran Israel War Update : इराणमध्ये 200 हून अधिक मृत्यू

इराणी माध्यमांनुसार, अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यात 201 इराणी मारले गेले आणि 747 जखमी झाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन उद्दिष्टे सांगितली: पहिले, इराणी नौदल नष्ट करणे, दुसरे, इराणचा क्षेपणास्त्र उद्योग नष्ट करणे आणि तिसरे, इराण अण्वस्त्रे मिळवू शकत नाही याची खात्री करणे. ट्रम्प यांनी अमेरिकन लोकांच्या संभाव्य जीवितहानीबद्दल इशाराही दिला. किंबहुना, इराणी अधिकाऱ्यांनी सांगितले की प्रत्युत्तर विनाशकारी असेल. इस्रायल आणि अमेरिकेने इराणमधील तेहरान, तब्रिझ, केरमानशाह, कोम, कारज आणि इस्फहानवर हल्ला केला. हल्ल्यानंतर तेहरानवरील आकाशात धुराचे लोट पसरले.