Karad

esahas.com

पोलिसांनी पाठलाग करुन तडीपार गुंडाला ठोकल्या बेडया

कराड शहर पोलीस ठाणेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने दिनांक 4 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री कराड शहरात थरारक पाठलाग करून सराईत तडीपार गुंडाला बेड्या ठोकल्या. अविनाश प्रताप काटे, असे पोलिसांनी पकडलेल्या तडीपार संशयीताचे नाव आहे.

esahas.com

कर्तव्यावर असताना ट्रॅफिक पोलिसाकडून होमगार्डला मारहाण

"तुझ्या बापाचा नोकर आहे का?" असं म्हणत चक्क एका ट्रॅफिक पोलिसानेच होमगार्डला मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ही घटना सातारा जिल्ह्यातील असून याबाबतचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

esahas.com

अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला

सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र व प्रख्यात अभिनेते पर्यावरण प्रेमी सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला झाला आहे. ही घटना तासवडे परिसरात मंगळवारी सकाळी घडली.

esahas.com

कराडच्या जत्रेत अनोख्या शिल्पातून संविधानाचा जागर

महिला बचत गटांच्या उत्पादीत मालांच्या विक्री प्रदर्शन असलेल्या कराडच्या जत्रेत कोरो इंडिया संस्थेच्या सहकार्याने ज्ञानदीप सामाजिक संस्थेचे समता फेलो मधुराणी थोरात व वैशाली पाटील यांनी संवैधानिक मूल्यांचा प्रसार करणारे एक मांडणी शिल्प सादर केले.

esahas.com

रिक्षाचा भीषण अपघात; एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू

कराड तालुक्यातील उंडाळे भागातील येणपे-लोहारवाडी येथे रिक्षाचा भीषण अपघात झाल्याची घटना शनिवारी समोर आली. या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला असून, तिघांना जीव गमवावा लागला आहे. मृतांमधे पलुंद्रे ता. शाहूवाडी येथील एकाच कुटूंबातील तिघेजण आहेत.

esahas.com

कराड तालुक्यातील महिलेची निर्घृण हत्या

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील वनवासमाची येथील निर्जनस्थळी महिलेचा खून झाल्याची घटना बुधवार रोजी उघडकीस आली आहे.

esahas.com

अचानक लागलेल्या आगीत कोट्यवधीची पाईप जळून खाक

पाणीपुरवठा योजनेसाठी उपलब्ध केलेल्या पाईप साठ्याला शुक्रवारी भीषण आग लागली. आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून कराड तालुक्यातील वडगाव हवेली येथे ही घटना घडली आहे.

esahas.com

विहिरीत पडून बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू

विहिरीत पडून बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना कराड तालुक्यातील धोंडेवाडी येथील ढोकरमाळ नावाच्या शिवारात घडली असून वनविभागाने बछड्याचा मृतदेह विहिरीबाहेर काढला आहे.

esahas.com

फुकट दारू न दिल्याने एकाने महामार्गावरील वाईन शाॅप पेटवले...!!

फुकट दारू दिली नाही म्हणून एकाने रात्रीच्यावेळी वाईन शॉप पेटवून दिले. नारायणवाडी (ता. कराड) येथे ही घटना घडली. याप्रकरणी कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

मलकापूर येथून दुचाकीची चोरी

मलकापूर, ता. कराड येथून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.