maharashtra

मलकापूर येथून दुचाकीची चोरी


मलकापूर, ता. कराड येथून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : मलकापूर, ता. कराड येथून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 14 फेब्रुवारी रोजी दुपारी पाच ते संध्याकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान ज्ञानेश्वर पुंडलिक सुतार यांची हिरो कंपनीची दुचाकी क्र. एमएच 12 पीडी 6370 मलकापूर, ता. कराड येथील कृष्णा-सरिता मार्केट येथून अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबतची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक बुधावले करीत आहेत.