deshvidesh

नेपाळमध्ये आता Gen Z चा रॅपर पंतप्रधान, कर्नाटकात शिक्षण, ओलींना हटवलं, कोण आहेत बालेन शाह?


Now a Gen Z rapper is the Prime Minister in Nepal, education in Karnataka, Oli was removed, who is Balen Shah?
नेपाळच्या आंदोलकांनी संसद पेटवली असून केपी ओली शर्मा यांनी पंतप्रधानपदाचा राजीनाम दिला आहे. त्यामुळे नेपाळमध्ये आता सत्तांतर होणार असून नवीन नेतृत्व उदयास येणार आहे.

 नेपाळमध्ये (Nepal) सोशल मीडिया (Social Media) वरील बंदीचे निमित्त ठरले आणि Gen Z आंदोलन पेटलं. युवकांनी हिंसक भूमिका घेत संसद (Nepal Parliament Fire) पेटवली, न्यायालयाला आग लावली. त्याचप्रमाणे मंत्र्यांच्या घरांवर हल्लाबोल केला. त्यामुळे पंतप्रधान केपी शर्मा ओली (KP Sharma Oli) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला असून ते दुबईला पळून जाण्याच्या तयारीत आहेत. त्याचवेळी सत्तांतराची प्रक्रिया सुरू झाली असून आंदोलकांनी एका युवकाचे नाव पंतप्रधान पदासाठी पुढे केलं आहे, ते नाव म्हणजे काठमांडूचे 35 वर्षीय महापौर (Kathmandu Mayor) बालेन शाह (Balendra Shah) होय. एक रॅपर (Nepal Rapper), महापौर ते आता नेपाळचे नवे नेतृत्व असा त्यांचा प्रवास काहीसा भन्नाट आहे.

Who Is Balendra Shah : कोण आहेत बालेन शाह?

बालेन शाह यांचा जन्म 27 एप्रिल 1990 रोजी काठमांडू येथे झाला. वडील आयुर्वेदिक चिकित्सक तर आई गृहिणी आहेत. त्यांनी BE सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. कर्नाटकातील विश्वेशरैय्या टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटमधून (Visvesvaraya Technological University VTU) त्यांनी स्ट्रक्चरर इंजिनिअरिंग या विषयात M.Tech पदवी घेतली.

13 मध्ये Raw Barz Rap Battle मधून ते आणखी लोकप्रिय झाले. रॅपच्या माध्यमातून त्यांनी नेपाळमधील भ्रष्टाचार, सामाजिक प्रश्न आणि राजकीय वास्तव यावर भाष्य केलं.

Balen Shah Political Journey : बालेन शाह यांचा राजकीय प्रवास

सन 2021 मध्ये त्यांनी काठमांडूच्या महापौर पदासाठी स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. 26 मे 2022 रोजी काठमांडू महानगरपालिकेच्या महापौरपदी त्यांनी जोरदार विजय मिळवला. त्यांनी नेपाळी काँग्रेस आणि CPN (UML) यांसारख्या मोठ्या पक्षांच्या उमेदवारांना पराभूत केले. 30 मे 2022 रोजी त्यांनी महापौरपदाची शपथ घेतली. काठमांडूचे पहिले स्वतंत्र महापौर म्हणून त्यांचा इतिहासात समावेश झाला. 2023 मध्ये TIME Magazine च्या ‘TIME 100 Next’ यादीत त्यांचा समावेश झाला.

Balen Shah Net Worth and Popularity : लोकप्रियता आणि संपत्ती

महापौर म्हणून त्यांचे मासिक वेतन सुमारे 46,000 आहे. अभियंता व्यवसाय, स्वतःची कंपनी Balen Consulting & Construction Pvt. Ltd., तसेच संगीत आणि स्टेज परफॉर्मन्समधून ते अतिरिक्त कमाई करतात. बालेन शाह यांची एकूण संपत्ती अंदाजे 5 ते 6 कोटी नेपाळी रुपये असल्याचे सांगितले जाते.

आजच्या Gen Z आंदोलनामध्ये युवक वर्गाचा मोठा पाठिंबा मिळाल्यामुळे अनेक जण त्यांना भविष्यातील राष्ट्रीय नेता म्हणून पाहत आहेत. त्यांच्या निर्भीड स्वभावामुळे ते आजच्या घडीला नेपाळच्या राजकारणातील सर्वाधिक चर्चेत असलेले नाव ठरले आहेत.

थोडक्यात, अभियंता, रॅपर आणि स्वतंत्र्य उमेदवार म्हणून महापौरपदावर निवडून आलेले बालेन शाह हे नेपाळच्या राजकारणात एक नवीन आणि पारदर्शक चेहरा म्हणून उदयास आले आहेत.