Karad

esahas.com

कराडचा उड्डाणपूल पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील...

कराडच्या कोल्हापूर नाका येथील उड्डाणपूल रविवारी पाडण्यास सूरूवात करण्यात येणार आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूकीबाबत सातारा जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांनी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे.

esahas.com

हॉटेलमध्ये विसरलेले १४ तोळे दागिने मिळाले परत

पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिवडे, ता. कराड गावच्या हद्दीत आपलं गांव मनपसंद फुडमॉल या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी थांबलेल्या एका कुटुंबाची ७ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असलेली पिशवी हॉटेल मालक यांनी तात्काळ पोलिस अधिकारी यांच्याशी संपर्क साधून संबंधित कुटुंबियांच्या स्वाधीन केल्याने कुटुंबियांनी हॉटेल मालक यांच्या प्रामाणिकपणाबद्दल आभार मानले आहेत.

esahas.com

हरवलेल्या व्यक्तीची घडवली नातेवाईकांशी भेट

भोसलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत राष्ट्रीय महामार्ग लगत महेश नाश्ता सेंटर आहे. सायंकाळी 6 च्या दरम्यान एक वयोवृद्ध इसम हातात फाटकी पिशवी, त्यामधे मळकट कपडे घेऊन दाखल झाला. त्याने हॉटेल मालकाकडे चहाची मागणी केली.

esahas.com

भोसलेवाडीत जवानाचे कुटुंब भोगतेय नरक यातना

भोसलेवाडी, तालुका कराड येथील वीट व्यवसायिकांकडून सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळण्याचे काम चालू आहे. या ठिकाणी सैन्य दलात कार्यरत असणारे जवान परशुराम राठोड यांच्या राहत्या घरापासून अवघ्या पाच फूट अंतरावर वीट भाजण्यासाठी भट्टी रचनेचे काम सुरू आहे. तरीही महसूल विभाग मात्र गांधारीच्या भूमिकेत वावरत आहे.

esahas.com

कराड तालुक्यात चैन स्नॅचिंग

दुशेरे, ता. कराड गावच्या हद्दीतून अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हिसकावून, चोरून नेल्याची तक्रार कराड तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

गहाळ व चोरीस गेलेले 4 लाख रूपयांचे 25 मोबाईल मूळ मालकांना परत

कराड शहर हद्दीतील गहाळ व चोरीस गेलेले 4 लाख रूपयांचे 25 मोबाईल वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले.

esahas.com

लोकायुक्त सुधार विधेयक पुन्हा चर्चेला यावे!

तब्बल 2 वर्षानंतर नागपुरला विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन झाले. मात्र, या सरकारने ते 2 आठवड्यात गुंडाळले. लोकायुक्त सुधार विधेयक घाईगडबडीत पारीत केले. अशा प्रकारे विधेयके पारीत करणे महाराष्ट्राला अशोभनीय आहे.

esahas.com

मनाई असताना चक्क कराडच्या प्रीतिसंगम उद्यानात झाली शिक्षकांची प्रचार सभा; यशवंतराव चव्हाण प्रेमी संतप्त

कराड-पाटण तालुका शिक्षक सोसायटीच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ चक्क प्रीतिसंगम उद्यानात केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर उद्यानात सतरंज्या अंथरून प्रचार शुभारंभाची सभा देखील घेण्यात आली.

esahas.com

साताऱ्यातील दुचाकीस्वाराचा रत्नागिरीत अपघाती मृत्यू

कोकणात रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील चक्री वळणाजवळ टँकर-मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.

esahas.com

अवैध दारू अड्ड्यावर छापा

कराड तालुक्यातील कालेटेक येथे बस थांब्याजवळच चोरटी दारू विक्री सुरू होती. याचा त्रास बस थांब्यावरील महिला, विद्यार्थिनींसह प्रवाशांना होत होता. कालेटेकचे पोलीस पाटील विठ्ठल जाधव व महेश जाधव यांच्याकडे तक्रारी आल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या मदतीने दारू विक्री रोखली. सहाय्यक पोलीस निरिक्षक बिराजदार यांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.