maharashtra

अवैध दारू अड्ड्यावर छापा

कालेटेक पोलीस पाटलांसह पोलिसांची कारवाई

कराड तालुक्यातील कालेटेक येथे बस थांब्याजवळच चोरटी दारू विक्री सुरू होती. याचा त्रास बस थांब्यावरील महिला, विद्यार्थिनींसह प्रवाशांना होत होता. कालेटेकचे पोलीस पाटील विठ्ठल जाधव व महेश जाधव यांच्याकडे तक्रारी आल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या मदतीने दारू विक्री रोखली. सहाय्यक पोलीस निरिक्षक बिराजदार यांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.

कराड : कराड तालुक्यातील कालेटेक येथे बस थांब्याजवळच चोरटी दारू विक्री सुरू होती. याचा त्रास बस थांब्यावरील महिला, विद्यार्थिनींसह प्रवाशांना होत होता. कालेटेकचे पोलीस पाटील विठ्ठल जाधव व महेश जाधव यांच्याकडे तक्रारी आल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या मदतीने दारू विक्री रोखली. सहाय्यक पोलीस निरिक्षक बिराजदार यांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.
रघुनाथ किसन झेंडे व नारायण इंगवले अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. दरम्यान कालेटेक परिसरात अवैध दारू व्यवसायाच्या विरोधात महिलांच्या तक्रारी वाढल्या असून याबाबत उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना निवेदन देणार असल्याचे पोलीस पाटील विठ्ठल जाधव यांनी पत्रकाद्वारे सांगितले. कालेटेक येथील बस थांब्याजवळ महिला, शालेय मुलींसह प्रवाशी नेहमी थांबलेले असतात. याच परिसरात अवैध दारूचा अड्डा एका बंद पडलेल्या सलूनच्या दुकानात सुरू होता. याबाबत पोलीस पाटील विठ्ठल जाधव, महेश जाधव यांच्याकडे महिलांनी तक्रारी केल्या. पोलीस पाटील यांनी पोलीस अधिक्षक रणजीत पाटील,पोलीस निरिक्षक आनंदराव खोबरे यांना माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरिक्षक एस. आर. बिराजदार यांनी कालेटेक येथे छापा टाकला. पोलिसांनी विठ्ठल जाधव, महेश जाधव यांच्यासमक्ष दारूचा साठा हस्तगत केला. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले.