maharashtra

हरवलेल्या व्यक्तीची घडवली नातेवाईकांशी भेट

उंब्रज पोलिसांची जागरूकता, यडे उफाळेतील वयोवृद्धाला मिळाले कुटुंब

भोसलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत राष्ट्रीय महामार्ग लगत महेश नाश्ता सेंटर आहे. सायंकाळी 6 च्या दरम्यान एक वयोवृद्ध इसम हातात फाटकी पिशवी, त्यामधे मळकट कपडे घेऊन दाखल झाला. त्याने हॉटेल मालकाकडे चहाची मागणी केली.

उंब्रज : खाकी वर्दी दिसली की त्यांची भीती, दहशत, दंडुका समोर दिसतो, सर्वसामान्य समाजात खाकी पासून चार हात लांबच बरे अशी धारणा असते, परंतु त्यांची दूसरी बाजु समाजासमोर येत नाही, गावगाड़ा सुरक्षित रहावा कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी डोळ्यात तेल घालून पोलिस यंत्रना लक्ष केंद्रित करते. त्यांच्या धकाधकी च्या जीवनात ही अनेक पोलिस अधिकारी, कर्मचारी आपले माणूसकीचे नाते विसरत नाहीत हेच खरे. त्यांच्यात देखील माणुसकी असते याचा प्रत्यय आला.
त्याचे झाले असे, भोसलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत राष्ट्रीय महामार्ग लगत महेश नाश्ता सेंटर आहे. सायंकाळी 6 च्या दरम्यान एक वयोवृद्ध इसम हातात फाटकी पिशवी, त्यामधे मळकट कपडे घेऊन दाखल झाला. त्याने हॉटेल मालकाकडे चहाची मागणी केली. त्यावेळी त्या ठिकाणी असणारे उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील यांना संबधित इसम हा उत्तम प्रकारे मराठी बोलत असून त्याची भाषाशैली सांगली भागातील असल्याचे जानवले. त्यामुळे त्यांनी त्याच्याकड़े अधिक चौकशी करण्याचा प्रयत्न केला. चौकशी मध्ये त्यांचे नाव नारायण मुळीक असून ते यड़े उफाळे, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली. मिळालेली माहिती पाटील यांनी उंब्रज पोलिस स्टेशनचे सपोनी अजय गोरड़ यांना कळवली.
यावेळी ताबडतोब घटनास्थळी दाखल होत अजय गोरड़ यांनी विटा तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचारी माने यांना दूरध्वनी वरून मिळालेल्या माहितीची सत्यता पडताळून पाहण्यास सांगितले. यावेळी माने यांनी दिलेल्या माहिती वरून नारायण मुळीक यांच्या नातेवाईक प्रवीण यांच्याशी संपर्क साधण्यात यश आले. अखेर अजय गोरड़, नारायण मुळीक यांना घेवून उंब्रज पोलिस ठाण्याकडे रवाना झाले. एका वृद्ध निराधार व्यक्ति व नातेवाईक यांची भेट घड़वण्यास सुनील पाटील व अजय गोरड यांची माणुसकीच कारणीभूत असल्याची घटनास्थळी चर्चा होती.