maharashtra

गहाळ व चोरीस गेलेले 4 लाख रूपयांचे 25 मोबाईल मूळ मालकांना परत


कराड शहर हद्दीतील गहाळ व चोरीस गेलेले 4 लाख रूपयांचे 25 मोबाईल वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले.

सातारा : कराड शहर हद्दीतील गहाळ व चोरीस गेलेले 4 लाख रूपयांचे 25 मोबाईल वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी कराड शहरात गहाळ व चोरीस गेलेले मोबाईल तसेच अन्य वस्तूंबाबत सखोल चौकशी करून तपास  करण्यासंदर्भात गुन्हे प्रकटीकरण शाखेला सूचना देऊन चोरीस गेलेल्या मोबाईलच्या शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर व त्यांच्या टीम मधील सहाय्यक फौजदार सतीश जाधव, रघुवीर यादव, नितीन येळवे, जयसिंग राजगे, संजय जाधव, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव, रवी देशमुख, संतोष लोहार, रईस सय्यद सोनाली मोहिते या कर्मचाऱ्यांच्या मदतीने तपास करून गहाळ झालेले व चोरीस गेलेले सुमारे 25 मोबाईल हस्तगत करण्यात मोलाची कामगिरी बजावली.
कराड येथील पोलीस भवनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या उपस्थितीत गहाळ झालेले मोबाईल संबंधितांची कागदपत्रे पडताळणी करून संबंधितांना देण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्यावतीने 2 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र राज्य पोलीस उन्नत दिन म्हणून साजरा केला जातो.