maharashtra

बँक हॉलिडे : उद्या शुक्रवारी बंद राहणार सर्व बँका; जाणून घ्या RBI ने 27 जूनला का दिली आहे सुट्टी


Bank Holiday: All banks will be closed tomorrow, Friday; Know why RBI has declared a holiday on June 27
Bank Holiday On 27 June 2025: उद्या शुक्रवारी 27 जूनला सर्व सरकारी आणि खासगी बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे जर तुमची बँकेची काही कामं असतील तर आजच करुन टाका.

Bank Holiday On 27 June 2025: उद्या शुक्रवारी बँका बंद राहणार आहेत. शुक्रवारी 27 जूनला सर्व सरकारी आणि खासगी बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे जर एखाद्याला उद्या बँकेत जाऊन बँकेचं एखादं काम करायचं असेल तर तो करु शकणार आहे. तुमच्या माहितीसाठी उद्या बँका फक्त दोन राज्यांमध्ये बंद राहणार आहेत. इतर सर्व राज्यात बँका सुरु राहतील. दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने 27 जूनला सुट्टी का जाहीर केली आहे हे समजून घ्या. 

शुक्रवारी 27 जून 2025 ला बँका का बंद राहणार?

27 जूनला रथयात्रेच्या कारणास्तव ओडिशा आणि मणिपूरमधील बँका बंद राहणार आहेत. रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर ओडिशा आणि मणिपूरमधील बँकांना सुट्टी असेल. ओडिशामधील पुरी येथील भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा एखाद्या सणाप्रमाणे अत्यंत धुमधडाक्यात साजरी केली जाते. या रथयात्रेत लाखो भक्त सहभागी होतात.
 
मणिपूरमध्ये याला कांगच्या नावाने ओळखलं जातं आणि तिथेही हा सण धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरेसह साजरा केला जातो. या राज्यांमध्ये सुट्टी असल्याने सर्व खासगी आणि सार्वजनिक बँका बंद राहणार आहेत.

डिजिटल बँकिंग सेवा सुरु राहणार

बँकांना सुट्टी असली तरी नेट बँकिंग, मोबाईल अॅप, युपीआय वॉलेट आणि एटीएमसारख्या डिजिटल सेवा आधीप्रमाणे सुरु असतील. म्हणजेच तुम्ही कोणत्याही अडथळ्याविना या सेवांचा लाभ घेऊ शकता. पण जर तुम्हाला चेक जमा करायचा असेल, ड्राफ्ट बनवायचा असेल, खातं उघडायचं असेल तर तुम्हाला अशी सर्व कामे बँकेच्या शाखेत जाऊनच करावी लागतील. त्यामुळे जर तुमची अशी काही कामं असतील तर आजच उरकणं फायद्याचं ठरेल.