maharashtra

कराड तालुक्यात चैन स्नॅचिंग


दुशेरे, ता. कराड गावच्या हद्दीतून अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हिसकावून, चोरून नेल्याची तक्रार कराड तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : दुशेरे, ता. कराड गावच्या हद्दीतून अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हिसकावून, चोरून नेल्याची तक्रार कराड तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १६ जानेवारी रोजी १.३० वाजण्याच्या सुमारास दुशेरे गावच्या हद्दीत बाळ सिद्धनाथ मंदिरासमोर शेरे ते दुशेरे जाणाऱ्या मार्गावर तेथीलच राधिका हणमंत जाधव, वय २८ ही महिला तिची मुलगी शिवांजली हिला शाळेतून आणण्यास जात असताना पाठीमागून काळया रंगाच्या दुचाकीवरून एक अज्ञात इसम आला. त्याने त्या महिलेच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हिसकावून, चोरून नेल्याची तक्रार कराड पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.