सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील वनवासमाची येथील निर्जनस्थळी महिलेचा खून झाल्याची घटना बुधवार रोजी उघडकीस आली आहे.
कराड : सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील वनवासमाची येथील निर्जनस्थळी महिलेचा खून झाल्याची घटना बुधवार रोजी उघडकीस आली आहे. जागतिक महिला दिनाच्या पुर्वसंध्येला महिलेच्या खुनाच्या घटनेमुळे वनवासमाची येथे शोककळा पसरली आहे.
लता मधुकर चव्हाण असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मंगळवारी रात्री ही खुनाची घटना उघडकीस आली आहे.
मंगळवारी दुपारी लता चव्हाण या गावाशेजारील जंगलात जळण आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यांची मुले शेणोली येथील अकलाई देवी च्या दर्शनाला गेली होती. मुलांनी घरी येवून नंतर लता चव्हाण यांचा शोध घेतला असता त्या आढळून आल्या नाहीत. दरम्यान गावकर्यांनी पोलिसांसमवेत लता यांचा शोध घेतला असता निर्जनस्थळी त्यांचा गळा आवळून व दगडाने खून झाल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहिती मिळताच तळबीड पोलीस ठाण्याचे राहुल वरुटे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान सातार्याहून श्वान पथकासही पाचारण करण्यात आले आहे. याचबरोबर कराडचे डीवायएसपी रणजित पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिली आहे.