कुडाळ, तालुका जावळी येथील युवा लघु चित्रपट निर्माते दिग्दर्शक अरीश इम्तियाज मुजावर यांना zeff प्लस इंटरटेनमेंटच्या तर्फे आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये आर. जे. केराबाई ही डॉक्युमेंटरी नामांकित होऊन हरीश मुजावर यांना आज पुणे येथे गौरविण्यात आले.
कुडाळ : कुडाळ, तालुका जावळी येथील युवा लघु चित्रपट निर्माते दिग्दर्शक अरीश इम्तियाज मुजावर यांना zeff प्लस इंटरटेनमेंटच्या तर्फे आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये आर. जे. केराबाई ही डॉक्युमेंटरी नामांकित होऊन हरीश मुजावर यांना आज पुणे येथे गौरविण्यात आले.
आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट फेस्टिवलमध्ये जगभरातून विविध लघु चित्रपट नामांकनासाठी आले होते. यामध्ये इंग्रजी भाषेतून माण तालुका रेडिओ आरजे म्हणून काम बघणारे आर जे केराबाई यांच्यावर व त्यांच्या जीवनशैलीवर इंग्रजी मधून लघु चित्रपट (डॉक्युमेंटरी) कुडाळ, तालुका जावळी येथील हरीश इम्तियाज मुजावर यांनी बनवली होती. नामांकनासाठी आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट फेस्टिवल मध्ये ती पाठवण्यात आली होती. ही लघु चित्रपट शॉर्ट फिल्म पाहिल्यानंतर अरीश मुजावर यांचा विशेष गौरव करण्यात आला. अरीश मुजावर यांनी आतापर्यंत 25 लघु चित्रपटाची विविध सामाजिक विषयांवर निर्मिती केली. समाजातल्या शेवटच्या स्तरापर्यंत जाऊन समाज घटनांवर डोळ्यात अंजन घालणाऱ्या व समाज प्रबोधनात्मक लघु चित्रपटाची व शॉर्ट फिल्म ची निर्मिती करून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न चित्रपट दिग्दर्शक निर्माते अरीश मुजावर यांनी केला आहे. याचा सन्मान आणि गौरव विविध ठिकाणी करण्यात आला आहे. त्यांच्या या यशाबद्दल जावळी तालुक्यासह सातारा जिल्ह्यात विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.