health

रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन


Cancer can be identified even from a single drop of blood, a big research of Reliance Industries
Cancer research : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची उपकंपनी आणि जीनोमिक्स आणि बायोइन्फॉरमॅटिक्समध्ये आघाडीवर असलेल्या स्ट्रँड लाइफ सायन्सेसने कॅन्सरबाबत मोठं संशोधन केलं आहे.

1326054" style="margin: 0px; padding: 0px; box-sizing: border-box; text-rendering: optimizespeed; font-family: var(--primary-font); font-stretch: normal; font-optical-sizing: auto; text-decoration: none; color: var(--explore-color);">कॅन्सर जर प्राथमिक अवस्थेत असेल तर त्यावर उपचार करणं शक्य असल्याचे सांगितले जाते. पण, भारतात अशा प्रकारचे संशोधन करण्यात काही अडचणी येत होत्या. मात्र, आता हे संशोधन करणं शक्य होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची उपकंपनी आणि जीनोमिक्स आणि बायोइन्फॉरमॅटिक्समध्ये आघाडीवर असलेल्या स्ट्रँड लाइफ सायन्सेसने मोठं संशोधन केलं आहे. 

Reliance Industries Limited ची उपकंपनी असलेल्या Strand Life Sciences ने CancerSpot नावाची नवीन रक्त-आधारित चाचणी सुरू केली आहे. याद्वारे, रक्ताच्या नमुन्याद्वारे कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखता येणार आहेत. 

कशी होणार चाचणी?

कॅन्सरस्पॉट डीएनए मिथाइलेशन  सिग्नेचर वापरते, जी जीनोम अनुक्रम आणि विश्लेषणाच्या विशेष प्रक्रियेद्वारे ओळखली जाते. ही सिग्नेचर भारतीय आकडेवारीच्या आधारे विकसित करण्यात आली आहे. त्याचा वापर जागतिक समुदायांवर देखील प्रभावी आहे. ही चाचणी कर्करोगाच्या सक्रिय आणि नियमित तपासणीसाठी एक सोपा आणि सोयीस्कर पर्याय प्रदान करते. दरम्यान,  रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची उपकंपनी आणि जीनोमिक्स आणि बायोइन्फॉरमॅटिक्समध्ये आघाडीवर असलेल्या स्ट्रँड लाइफ सायन्सेसने केलेलं संशोधन हे खूप मोठं आहे. याचा मोटा फायदा होणार आहे. 

औषधांच्या क्षेत्रात नवीन नवनवीन शोध लावण्याचे रिलायन्सचे उद्दिष्ट : ईशा अंबानी 

उद्योगपती जी मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी पिरामल यांनी दिलेल्या माहितीनुसार, , मानवतेची सेवा करण्यासाठी औषधांच्या क्षेत्रात नवीन नवनवीन शोध लावण्याचे रिलायन्सचे उद्दिष्ट आहे. कर्करोग हा झपाट्याने वाढणारा आजार आहे. भारतातील ही एक गंभीर समस्या आहे ज्यामुळे रुग्णांवर मोठा आर्थिक, सामाजिक आणि मानसिक भार पडतो. ही नवीन कॅन्सर स्क्रीनिंग चाचणी आपल्या आरोग्य सेवा प्रणालीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी जीनोमिक्सच्या सामर्थ्याचे उत्तम उदाहरण आहे. भारत आणि जगाचे आरोग्य आणि जीवन सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यास वचनबद्ध असल्याचे ईशी अंबानी यांनी सांगितलं. 

कर्करोगावर मात  करण्यासाठी लवकरात लवकर शोध घेणे गरजेचं

स्ट्रँड लाइफ सायन्सेसचे सीईओ आणि सह-संस्थापक डॉ. रमेश हरिहरन म्हणाले, की कर्करोगावर मात  करण्यासाठी लवकरात लवकर शोध घेणे महत्त्वाचे आहे. आम्ही लोकांना मदत होऊ शकेल अशी सोपी आणि सुलभ चाचणी सुरू केली आहे.