health

शरीरात अशक्तपणा जाणवतोय? काळजी करू नका; 'या' 10 पदार्थांचा आहारात समावेश करा


Feeling weak in body? Don't worry; Include 'these' 10 foods in your diet
लोकांना आरोग्याबाबत जागरूक करण्यासाठी दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. दैनंदिन जीवनशैलीत खाण्या-पिण्याच्या वेळा पाळल्या जात नाहीत. अशा वेळी अवेळी जेवण केल्याने शरीराला अनेक त्रास होतात. त्याचबरोबर आपले शरीर आणि मन दोन्ही निरोगी असणे गरजेचे आहे. यासाठी आपल्या आहारात काही पदार्थांचा समावेश असणे गरजेचे आहे. हे पदार्थ नेमके कोणते ते जाणून घ्या.

पालक - पालक हे पोषक तत्वांनी युक्त सुपरफूड आहे. आरोग्य तज्ञ पालक हे पृथ्वीवरील सर्वात आरोग्यदायी अन्न मानतात. पालक एनर्जीने भरलेला असतो आणि त्यात खूप कमी कॅलरीज असतात. पालक हे व्हिटॅमिन ए आणि के यांचा चांगला स्त्रोत मानला जातो.


लसूण - लसणाचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत. लसणात बॅक्टेरियाशी लढण्याची क्षमता असते. शतकानुशतके रोगांपासून संरक्षण म्हणून त्याचा वापर केला जातो. शक्तिशाली दाहक-विरोधी लसूण कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब कमी करण्यासाठी देखील प्रभावी आहे. 

लिंबू - लिंबूने हेल्थ इंडस्ट्रीमध्ये सुपरफूड म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. या लिंबूवर्गीय फळामध्ये दाहक विरोधी गुण तर आहेतच. पण ते शरीरात कर्करोगाच्या पेशी विकसित होण्यापासून रोखू शकतात. यामध्ये व्हिटॅमिन सी संत्र्यांइतकेच असते. लिंबू आपल्या यकृत आणि आतड्यांसाठीदेखील खूप फायदेशीर आहे. 


बीट - बीट केवळ आपल्या मेंदूसाठी चांगले नाही तर ते रक्तदाबही नियंत्रित ठेवते. ते खाल्ल्याने व्यायामाची कार्यक्षमता वाढते. आणि स्मृतिभ्रंशाचा धोकाही कमी होतो. या भाज्यांमध्ये फॉलेट, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक असतात. 

डार्क चॉकलेट - चॉकलेटमध्ये उच्च अॅंटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. जे फ्री रॅडिकल्समुळे होणारे रोगदेखील प्रतिबंधित करतात. डार्क चॉकलेट कॅन्सरपासून बचाव करते. 

कडधान्ये - मसूरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रथिने असल्यामुळे ते सुपरफूड मानले जाते. यामध्ये असलेले पोषक तत्व आपल्या हृद्याच्या आरोग्यासाठी उत्तम आहेतच पण वजन कमी करण्यासाठी, ऊर्जा वाढविण्यासाठी आणि रक्तातील साखर कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. 

अक्रोड - कोणत्याही ड्रायफ्रूटपेक्षा अक्रोडमध्ये जास्त अॅंटीऑक्सिडंट्स असतात. असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. अक्रोड रक्तवाहिन्यांमधील जळजळ तसेच ऑक्सिडेशन कमी करते. दररोज किमान 8 अक्रोड खावे. 

सॅल्मन फिश - सॅल्मन फिश ओमेगा-3 फॅटी एॅसिडचा चांगला स्त्रोत आहे. ज्यामुळे नैराश्य तसेच हृदयविकार आणि कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो. यामध्ये उच्च प्रथिने, जीवनसत्व आणि खनिजे देखील चांगले असतात. 

एवोकॅडो - एवोकॅडोची गणना जगातील सर्वात शक्तिशाली वस्तूंमध्ये केली जाते. आरोग्यदायी फॅटी एॅसिड्स आणि फायबरने समृद्ध असलेले एवोकॅडो आपले डोळे, संधिवात आणि कर्करोगाचा धोका कमी करते. 

रास्पबेरी - रास्पबेरी खाल्ल्याने लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकाराचा धोका कमी होतो. रास्पबेरी खाल्ल्याने आपल्या शरीराला त्वरीत ऊर्जा मिळते.