health

मेंदूतील रक्ताभिसरण वाढवण्यासाठी 4 साधे आणि सोपे उपाय!


4 simple and easy ways to increase blood circulation in the brain!
तुमच्या मेंदूला योग्य आणि चांगल्या पद्धतीने रक्तपुरवठा होण्यासाठी आम्ही आज काही पर्याय सांगणार आहोत.

आपल्या मेंदूला योग्यरित्या कार्य करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते आणि ऑक्सिजनचा पुरवठा रक्ताद्वारे होतो, जर रक्त प्रवाह चांगला असेल तर तुमचा मेंदू अधिक चांगलं काम करू शकेल. तुमच्या मेंदूला योग्य आणि चांगल्या पद्धतीने रक्तपुरवठा होण्यासाठी आम्ही आज काही पर्याय सांगणार आहोत.

अन्न गिळताना त्रास होणं, बोलण्यात अडखळत असाल किंवा स्नायू कमकुवत झाले असतील, शरीराच्या अवयवांमध्ये सुन्नपणा जाणवत असेल, दृष्टी कमी होत असेल तर ही लक्षणे तुमच्या मेंदूतील रक्तप्रवाह कमी होत असल्याची आहेत. ही लक्षणं दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जा. ही लक्षणं कालांतराने तीव्र होऊ शकतात. 

मेडिटेशन करा
मेंदूतील रक्तप्रवाह वाढवायचं असेल तर मेडिटेशन करावं. ध्यान केल्याने रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आणि मेंदू व्यवस्थित काम करतो.
ब्रिदिंग एक्‍सरसाइज
मेडिटेशनव्यतिरिक्त तुम्ही रोज ब्रिदींग एक्‍सरसाइज करावी. श्वासोच्छवासाच्या व्यायामामुळे मान, खांदा, छातीचे स्नायू शिथिल होतात. ज्यामुळे रक्त प्रवाह सुधारतो. श्वासोच्छवासाचे व्यायाम करण्यासाठी सकाळची वेळ योग्य असते. 

दररोज एक्सरसाईज करा
मेंदूला योग्यरित्या रक्तपुरवठा होण्यासाठी दररोज व्यायाम करावा. मेंदूतील रक्ताभिसरण चांगलं राहण्यासाठी व्यायामाचे अनेक फायदे आहेत. व्यायाम केल्याने शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आणि रक्तप्रवाह सुधारतो. जर तुम्हाला व्यायाम करायचा नसेल, तर तुम्ही स्विमींगही करू शकता.

पायी चाला
मेंदूला रक्तपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तुम्ही रोज पायी चालणंही फायदेशीर ठरेल. यासाठी तुम्ही दिवसातून 3 ते 5 मिनिटंही चालू शकता. चालण्याचे अनेक फायदे आहेत, त्यातील एक म्हणजे शरीरातील रक्ताभिसरण चांगलं राहतं.