दररोजचा नाश्ता काय करावा, हा खरं तर प्रत्येक घरातल्या महिलेसमोरचा खूप मोठा प्रश्न. त्यात जर कुणी वेटलॉस करत असेल किंवा घरातल्या कुणाला शुगर असेल तर अशा सगळ्यांनाच चालेल असा आणि त्यातही पुन्हा चवदार नाश्ता बनवणं हा तर खरंच एक अवघड टास्क असतो.. म्हणूनच तर हे बघा नाश्त्याचे काही सुपर हेल्दी पर्याय (super healthy breakfast items).. अशा प्रकारचा नाश्ता असेल तर घरातले सगळेच खूश होऊन जातील..(
१. हरबऱ्याच्या डाळीचं पनीर टाकून केलेलं धीरडं आणि पुदिना- कोथिंबीर चटणी
२. पाठीच्या म्हणजेच हिरव्या मुगाच्या डाळीचा डोसा आणि नारळाची चटणी
३. भरपूर भाज्या आणि पनीर घालून केलेले पोहे
४. पनीर स्टफ ज्वारीचा पराठा आणि घरी केलेलं एखादं लोणचं
५. ओट्स आणि ढोकळा
६. बेसन आणि गव्हाचं पीठ घालून केलेला पराठा आणि घरचं लोणच
७. ओट्स आणि मुगडाळ घालून केलेली इडली आणि त्यावर कढीपत्ता टाकून घातलेली फोडणी
८. ओट्स, २ अक्रोड आणि सब्जा घालून दह्यामध्ये केलेलं पुडींग
९. हरबरा स्प्राऊट, पनीर टीक्की आणि पुदिना चटणी
१०. प्रोटीन किक Smoothie- यासाठी १ मुठभर रोस्टेड मखाना, दोन टीस्पून सातुचं पीठ, २०० मिली नारळाचं पाणी किंवा साधं दूध, अर्ध केळ, चिमूटभर वेलची पावडर आणि एक खजूर एवढं साहित्य लागेल. हे सगळं साहित्य मिक्सरच्या पॉटमध्ये टाका आणि त्याची छान स्मुथी करा. प्रोटीन रिच असणारी ही स्मुथी अतिशय पौष्टिक आहे.


