Health Tips : योगासन करण्यापूर्वी आणि नंतर काय खावं? आरोग्यासाठी फायदेशीर असलेले पदार्थस, घ्या जाणून
योगाशी संबंधित सर्व तज्ज्ञांचे म्हणणे आहे की केवळ आरोग्यास उपयुक्त आणि संतुलित आहारामुळे़ योगाचा पूर्ण फायदा हा आरोग्यास होऊ शकतो. योग करण्यापूर्वी आणि नंतर कोणते अन्न खावे , हे जाणून घेऊया.
Yoga Tips : योग आणि व्यायाम शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत आणि त्याचे अनेक फायदे देखील आहेत. योगामुळे शरीर तर निरोगी राहतेच शिवाय अनेक आजार दूर होतात. निरोगी शरीराकरीता नियमीत योगा करणे फार आवश्यक आहे. भारतीय संस्कृतीमध्ये ही योगासनाचे अनन्यसाधारण महत्व सांगितले आहे. आरोग्य आणि वजन कमी करण्याच्या बाबतीत योगा ही अनेक लोकांची पहिली पसंत आहे. रोजचा ताणतणाव कमी करण्याकरीता देखील योगासन करणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो. योगा केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते.
योगा करण्याआधी काही खायला हवे का ?
सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी योगा करणे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. मात्र सकाळी योगा करण्याआधी एखादे केळ किंवा जांभूळ खाणे उपयुक्त ठरू शकते. तसेच दही , फळाचा ज्युस , प्रोटीन शेक याचे देखील तुम्ही योगासनापूर्वी सेवन करू शकता . यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. तुम्ही सायंकाळच्या वेळी योगा करत असाल तर उकडलेल्या भाज्या आणि सलाड याचे सेवन करू शकता.
योगा करण्याआधी भरपूर पाणी प्या
योगा करण्याआधी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. अगदीच रिकाम्या पोटी योगा करणे शरीरासाठी घातक ठरू शकते. यामुळे अनेकदा डिहायड्रेशनचा देखील त्रास होण्याची शक्यता असते.
योगा करण्याआधी चहा पिऊ नये
योगा करण्यापूर्वी चहा पिणे टाळावे. चहा पिल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने लगेच थकवा येतो. योगासन पूर्ण झाल्यानंतर 15-20 मिनीटानंतर तुम्ही चहा पिऊ शकता.
योगासन करण्यापूर्वी या पदार्थांचे सेवन करावे
1. दही
2. पाणी
3. फळांचा ज्युस
4. रताळे
5. भिजवलेले बदाम
योगासनानंतर काय खावे
योगासनानंतर जवळपास 30 मिनीट काहीच खाऊ नये. त्यानंतर तुम्ही उकडलेले अंडे , अनेक प्रकारच्या डाळी , दही याचे सेवन करू शकता. योगासनानंतर कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन असलेले सर्व पदार्थ तुम्ही खाऊ शकता. तसेच ग्रीन टी सुद्दा तुमच्या शरीराकरीता फायदेशीर ठरू शकतो.
योगासनानंतर किती वेळाने पाणी प्यावे
योगासने करण्यापूर्वी तुम्ही पाणी पिऊ शकता परंतु योगानंतर लगेच पाणी पिणे टाळा. सुमारे 20-30 मिनिटांच्या योगाभ्यासानंतर पाणी पिणे फायदेशीर मानले जाते. योगानंतर लगेच पाणी प्यायल्याने शरीरात आणि पोटात क्रॅम्प येऊ शकतात.