काँग्रेसच्या काळात लोकांना दोन वेळेचं अन्नही मिळत नव्हतं. अनेकांना डोक्यावर छप्परही नव्हतं. अशा काँग्रेसी मनोवृत्तीच्या नेत्यांनी महाविकास आघाडी तयार करून निवडणूक लढवणे सुरू केले आहे, अशा महाभकास आघाडीला घरी बसवा, असे आवाहन महायुतीचे लोकसभा उमेदवार उदयनराजे भोसले यांनी केले.
सातारा : काँग्रेसच्या काळात लोकांना दोन वेळेचं अन्नही मिळत नव्हतं. अनेकांना डोक्यावर छप्परही नव्हतं. अशा काँग्रेसी मनोवृत्तीच्या नेत्यांनी महाविकास आघाडी तयार करून निवडणूक लढवणे सुरू केले आहे, अशा महाभकास आघाडीला घरी बसवा, असे आवाहन महायुतीचे लोकसभा उमेदवार उदयनराजे भोसले यांनी केले.
कोंडवे येथे आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले, माजी नगराध्यक्ष रंजनाताई रावत, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य रेशमाताई शिंदे, अनिता चोरगे, संगिता ननावरे, सीमा जाधव सुरेखा गायकवाड, संदीप शिंदे यांची प्रमुख उपस्थित होती.
उदयनराजे म्हणाले, देशाला महासत्तेच्या दिशेने नेण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व जगांनी मान्य केले असून त्यांना साथ देणे आपले कर्तव्य आहे.