maharashtra

सांगली येथील पूरस्थिती आटोक्यात आणण्यासाठी भारतीय लष्कराची मदत


Indian Army help to control the flood situation in Sangli

           लष्कराने  सांगली येथे पूरग्रस्तांच्या बचाव कार्यासाठी   पथक  पाठवले आहे. यामध्ये अभियंता कृती दल , पायदळ    आणि वैद्यकीय पथकातील सुमारे 100 जवानांचा   समावेश असून हे पथक  जिल्हाधिकाऱ्यांच्या  मागणीनंतर बचाव उपकरणे आणि बोटीसह तैनात करण्यात आले  आहे. या पथकाने जिल्हाधिकारी, पोलीस आणि आपत्ती निवारण पथकांसह सर्व संबंधितांबरोबर  तातडीच्या बैठका घेतल्या. आज सकाळी सर्व ठिकाणांची संयुक्त तपासणी करण्यात आली आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यात आले. पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर  सध्या सुरू असलेल्या मदत आणि बचाव कार्यात आवश्यक  मदत आणि सहाय्य पुरवण्यासाठी बचाव नौका आणि इतर आरोग्य सेवा सामग्रीसह  लष्कराचे पथक  तैनात करण्यात आले आहे.