कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर ख्याती असलेले श्री.विनोद वैजनाथ चव्हाण, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा यांची प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट अ या संवर्गात पदोन्नती झाली असून त्यांची पदस्थापना प्रादेशिक परिवहन कार्यालय, लातूर येथे करण्यात आली आहे.
श्री. विनोद वैजनाथ चव्हाण यांनी सातारा येथील आरटीओ चा चेहरा मोहरा बदलून सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला होता. कोणतीही कामे पेंडिंग न ठेवता वेळेत पूर्ण करण्यासाठी ते तत्पर होते. सर्वांसाठी एकच न्याय या पद्धतीची त्यांची कार्यपद्धत होती पदोन्नतीवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.